Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथे पर्यावरण पूरक अंत्यसंस्काराने वेधले लक्ष 

मुक्ताईनगरचे नगरसेवक संतोष कोळी यांनी वडिलांच्या पार्थिव अंत्यविधीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Admin by Admin
June 24, 2022
in जळगाव, मुक्ताई वार्ता
0
मुक्ताईनगर येथे पर्यावरण पूरक अंत्यसंस्काराने वेधले लक्ष 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुक्ताईनगर येथे पर्यावरण पूरक अंत्यसंस्काराने वेधले लक्ष
मुक्ताईनगरचे नगरसेवक संतोष कोळी यांनी वडिलांच्या पार्थिव अंत्यविधीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मुक्ताईनगर : येथील नगरपंचायतीचे प्रभाग क्र.१ चे नगरसेवक संतोष उर्फ बबलू कोळी यांचे वडील स्व. प्रल्हाद पंढरीनाथ कोळी यांचे दि.२४ जून शुक्रवार रोजी पहाटे दुःखद निधन झाले. वृक्ष प्रेमी व निसर्ग वन प्रेमी असलेले नगरसेवक कोळी यांनी दुःखदायक व चिरंतन सत्य असणाऱ्या वडिलांच्या मृत्यूचे दुःख जरी असले तरी हिंदु धर्मात पार्थिवाला अग्नी डाग देणे पवित्र मानले जाते.परंतु अशा अंत्यविधीत लाकडांचा मोठ्याप्रणावर उपयोग होत असल्याने वन संपदेचे व पर्यायी निसर्गाचे नुकसान होऊन प्रदूषण ही होते. याच गोष्टीचे भान ठेवून त्यांनी पर्यावरण पूरक अंत्यविधी करण्याचे ठरवले आणि अमळनेर येथील जनसेवा फाऊंडेशन व अमळनेर गोशाळा यांच्या कडून पित्याचा अंत्यविधी पर्यावरण पूरक करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
(फोटो – स्व. प्रल्हाद पंढरीनाथ कोळी)
पर्यावरण पूरक अंत्यविधी :
या पर्यावरण पूरक अंत्यसंस्कारात पार्थिव शरीराच्या दहनासाठी लाकडांचा अजिबात वापर केला जात नाही. त्याऐवजी गोशाळेत गायीच्या शेणापासून तयार झालेल्या मोठ्या आकाराच्या गोवऱ्या, गाईचे शुद्ध तूप, कापूर आणि चंदनाचा वापर केला जातो. स्मशानात चितेभोवती व स्मशानातील फाटकापर्यंत सुंदर रांगोळ्या स्मशानातील फाटकापर्यंत व मृत व्यक्तीच्या घराजवळ देखील रांगोळ्या काढल्या जातात. चिता आणि परिसर फुलांनी सजविण्यात येतो. या प्रकारच्या अंत्यसंस्कारात डिझेल, पेट्रोल, रॉकेल आणि लाकूड यांचा वापर करण्यात येत नाही. यावेळी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात किमान एका झाडाचे लाकूड वाचते असा या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली.
अमळनेर येथील महावीर युवा परिषद संचलितअमळनेर गोशाळा(पांजरा पोल) व  जनसेवा फाउंडेशन  या सामाजिक संस्थेने या विधीला २०१७ पासून सुरुवात केली आहे. या फाउंडेशनच्या २५ ते ३० वर्षांपासून गोशाळा असून या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष, प्रा. अरुण कोचर यांनी ह्या पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार विधीची कल्पना अंमलात आणली. या विधीत १२०० गोवरी, २ किंवा ५ किलो गाईचे तूप, १ किलो कापूर, खोबरे वाटी २ किलो, किंवा नारळ २५ नग, चंदनाचे छोटे लाकूड, फुलहार, रांगोळी आदींचा उपयोग केला जातो. गोवरी रचण्याचे काम जनसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते स्वतः करतात. या विधीसाठी कोणीही. कुठूनही कॉल केल्यास फाउंडेशनचे सदस्य सर्व ठिकाणी हजर होतात.
(यासाठी संपर्क क्र. 9075507420 )
पर्यावरणपूरक विधीची वैशिष्ट्ये…
■ पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणपणे ३५० ते ४०० किलो लाकडांचा वापर होतो. तथापि, पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार विधीत चंदनाची काठी वगळता थोडेही लाकूड वापरले जात नाही.
■ या विधीमुळे प्रदूषणही कमी होते व लाकडाची मोठ्या प्रमाणात बचत होते.
■ पारंपरिक पद्धतीने एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे ४ तास इतका कालावधी लागतो. तर पर्यावरण पूरक विधीमध्ये सुमारे दोन ते तीन तासात अंत्यसंस्कार होतात.
■ पारंपरिक पद्धतीपेक्षा पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार विधीमध्ये धुराचे प्रमाण कमी होते.
Previous Post

मुक्ताईनगर तालुक्याची संगायो समिती गठीत

Next Post

मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती गठीत

Admin

Admin

Next Post
वडगांव (महालखेडा) ता.मुक्ताईनगर येथील हेमाडपंथी श्री.महादेव मंदिर देवस्थानास “क” वर्ग  तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त 

मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती गठीत

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group