मुक्ताईनगर येथील शिवजयंती उत्सव रक्तदान शिबीर व विविध उपक्रमांनी होतोय साजरा !
मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसल्यानंतर पुतळ्याच्या साक्षीने प्रथमच भव्य दिव्य असा शिवजयंती महोत्सव साजरा केला जात आहे. रक्तदान शिबिर फळ वाटप मुस्लिम बांधवांतर्फे रात्री नऊ ते दोन वाजेपर्यंत जंगी मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यातून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन होणार आहे. भव्य सजीव देखावांची मिरवणूक , जळगाव येथील शिव ढोल पथक, जुने गाव मुक्ताईनगर येथील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचे लेझीम पथक अशा स्वरूपात भव्य मिरवणूक निघणार आहे. तसेच तमाम शिवप्रेमींचे स्वप्न पूर्ण करून पुतळा स्थापन स्थापन केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचा शिवप्रेमिंतर्फे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान श्रेष्ठ दान रक्तदान शिबीरा रक्तदात्यांनी रक्तदान करते वेळी तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करताना शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीनकुमार जैन, मराठा समाज तालुका अध्यक्ष आनंदराव देशमुख, मराठा सेवा संघ राष्ट्रीय वसतिगृह कक्षाचे अध्यक्ष दिनेश कदम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, भावराव महाराज , किशोर गावंडे, दिलीप पाटील , शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, नगरसेवक संतोष मराठे, निलेश शिरसाट, पीयूष मोरे, संतोष कोळी , राजेंद्र हिवराळे, नरेंद्र सापधरे, गणेश पाटील, चेतन पाटील ,सोपान मराठे, प्रवीण भोई, अनिकेत भोई, पप्पू मराठे, किरण महाजन, साहेबराव पाटील, भागवत पाटील आदींसह असंख्य शिवप्रेमी बांधवांची उपस्थिती होती.
सायंकाळी भव्य मिरवणूक सोहळा पार पडणार आहे.
मुक्ताईनगर येथील जगजीवनदास इंग्लिश मिडिया स्कूलच्या शिक्षिका श्रीमती अर्चना दिनकर भोळे मॅडम यांनी छत्रपती शिवरायांची अतिशय सुंदर अशी रांगोळी काढून शिवरायांना मानवंदना दिली. या रांगोळीची संस्थेच्या चेअरमन ॲड रोहिणी खडसे यांनी स्तुती केली तसेच यानंतर ही रांगोळी प्रवर्तन चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या समोर शिवप्रेमींना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती.