मुक्ताईनगर येथील रिक्त नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीचे अध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची विशेष सभा नगरपंचायत मुक्ताईनगरच्या सभागृहात दि.२२.०७.२०२२ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. पिठासिन अधिकारी यांनी अध्यक्ष पदाची निवडणुक घेवून त्याच दिवशी दू.४ वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी दि.१५ जुलै २०२२ रोजी लेखी पत्राद्वारे काढले असून पिठासिन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ,भुसावळ, भाग भुसावळ जि.जळगाव हे राहतील.
नगरविकास मंत्रालय विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन राजपत्र दि.२९ जून २०१८ नुसार मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पद हे अनुसूचित महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होते.परंतु सन २०१८ च्या सार्वत्रिक निवडणूकित अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातून लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या श्रीमती सुरेखा अफजल तडवी उर्फ नजमा इरफान तडवी यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्याने त्यांना महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-१ ब नुसार दि ०८.११.२०२१ अन्वये अपात्र घोषित करण्यात आले होते. याकरिता शासनाकडून रिक्त पदासाठी मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानुसार अवर सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र दि.०७ जुलै 2022 अन्वय अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील उमेदवार अध्यक्षपदासाठी उपलब्ध नसल्यास अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गातील सदस्यांची नियुक्ती नगराध्यक्ष पदासाठी करता येईल असे कळविले आहे.
निवडणूक कार्यक्रम असा :
नामनिर्देशन पत्र नगरपंचात कार्यालय मुक्ताईनगर येथे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वीकारतील.
१) नामनिर्देशन देणे व स्विकारण्याची दिनांक १८.०७.२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
२) नामनिर्दशनपत्र छाननी : दिनांक १८.०७.२०२२ रोजी दुपारी २.०० वाजेनंतर
३) नामनिर्देशन फेटाळणे , कारणे,उमेदवारांची नावे सूचना फलकावर प्रसिद्ध करणे . दिनांक १८.०७.२०२२ रोजी छाननी नंतर सायं.५ वाजेपर्यंत.
४) पिठासिन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याचा कालावधी : दिनांक १९.०७.२०२२ ते २०.०७.२०२२ रोजी सायं.५ वाजेपर्यंत.
५) वैद्य नाम निर्देशन पत्राची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करणे : दिनांक २०.०७.२०२२ रोजी सायं.५ वाजेनंतर.
६) उमेदवारी मागे घेणे : दिनांक २१.०७.२०२२ रोजी सायं.५ वाजेपर्यंत.
७)निवडणूक सभेचा दिनांक व वेळ : दिनांक २२.०७.२०२२ रोजी सकाळी १२ वाजता.
८) निवडणूक लढविणाऱ्या व उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे सभेत वाचून दाखविणे : दिनांक २२.०७.२०२२ रोजी सकाळी १२ वाजता सभा सुरू झाल्यावर.
९) अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे व निकाल घोषित करणे .: दिनांक २२.०७.२०२२ रोजी सकाळी १२ वाजेनंतर.