मुक्ताईनगर येथील डॉ.जगदीश पाटील यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदी निवड
मुक्ताईनगर — मुक्ताईनगर येथील पाटील हॉस्पिटलचे संचालक तसेच गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ.जगदीश तुकाराम पाटील यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे. मुंबई येथे 20 सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सदरचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र डॉ.जगदीश पाटील यांना देण्यात आले आहे. आधी सुद्धा डॉ.जगदीश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा आहे. त्यांचा ओबीसींसाठी घेण्यात येणाऱ्या मोर्चे व आंदोलने यांच्यामध्ये सहभाग असतो.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.