मुक्ताईनगर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट !
सर्वच विकास कामांसंदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदार संघातील रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात, शेती शिव रस्ते दर्जोंन्नत करून प्लॅनवर आणून अन्य लेखाशिर्श मधून करणे बाबत, बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे, मुक्ताईनगर येथे एस टी महामंडळाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारणे, मुक्ताईनगर येथे ॲम्युजमेंट पार्क उभारणे, रखडलेल्या विविध प्रकल्पांवर निधीची तरतूद करणे यासह मतदार संघातील अनेक विविध विकास कामांसंदर्भात आज दि.20 ऑक्टोंबर 2022 रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठक प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्रव्यवहार करून चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करून विविध मागण्यांच्या अनुषंगाने तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार हे सर्व सामान्यांचे सरकार असून मोठ मोठे प्रकल्प सहज मंजूर करीत असून मागील महिन्यात मुक्ताईनगर मतदार संघासाठी सर्वात मोठी उपलब्धी असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाला मंजुरी दिली, अर्थसंकल्प मधून रस्त्यांसाठी ५० कोटी, नगरविकास अंतर्गत ४० कोटी यासह इतर विविध विकास कामे मतदार संघात खेचून आणण्यात यश आलेले असून यापुढेही आमदार पाटील आणखी करोडो रुपयांची विकास कामे मतदार संघात खेचून आणतील असे चित्र आहे. त्यामुळे त्यांना “विकास महर्षी” म्हणून त्यांच्या नावापुढे ब्रीद लावण्यात येत आहे.”