मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदासाठी पियूष मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; छाननी अंती उमेदवारी अर्ज वैध
राज्यातील सत्ता बदलानंतर शिवसेना भाजपा युतीतील शिदे गटाचे ते पहिले नगराध्यक्ष ठरणार !
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीचे रिक्त नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम लागलेला असून आज दि.१८ जुलै २०२२ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे असल्याने या जागेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजपा पक्षातर्फे पियूष भागवत मोरे (महाजन) यांनी उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांचेकडे सादर केला. दुपारी २ वाजेनंतर पिठासीन अधिकारी भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंगस सुलाने यांनी प्राप्त झालेला एकमेव उमेदवारी अर्ज छाननी अंती वैध असल्याचे घोषित केले.
माजी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा नगरसेवक ललित महाजन, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, नगरसेवक तथा गटनेते निलेश शिरसाट,नगरसेवक तथा गटनेते राजेंद्र हिवराळे , नगरसेवक तथा उपगटनेते संतोष कोळी, सार्वजानिक बांधकाम सभापती तथा नगरसेवक संतोष मराठे, पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे, महीला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सविता भलभले, सार्वजानिक आरोग्य व मलनिस्सारण सभापती तथा नगरसेवक नुसरतबी महेबुब शेख, नगरसेविका शबाना बी अब्दुल आरिफ, नगरसेविका बिलकीसबी अमानउल्ला खान, नगरसेवक डॉ प्रदीप पाटील,शहर संघटक वसंत भलभले, राजेंद्र तळेले, शकुर जमदार, अनिकेत शुरपाटणे, रोहनकुमार बोदडे आदींसह असंख्य शिवसेना , भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.