मुक्ताईनगर तालुक्याची नविन संगायो समिती गठीत
अध्यक्षपदी पुन्हा अनंतराव देशमुख यांची वर्णी
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुचविलेल्या नावांप्रमाणे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर तालुक्याची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्यात आली असून समिती नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रभारी जळगांव जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या स्वाक्षरी निशी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाला दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी प्राप्त झाले आहे.
संगायो समिती खालील प्रमाणे झाली गठित :
अध्यक्ष – अनंतराव रामराव देशमुख (रा. हरताळे)
सदस्य – सुर्यकांत अभिमन्यू पाटील (रा. चारठाणा)
सदस्य – सौ.नीलिमा देवानंद वंजारी, (मुक्ताईनगर)
सदस्य – मोहन शालीग्राम बेलदार, (रा. अंतुर्ली)
सदस्य – पंकज भास्करराव पांडव, (कुऱ्हा)
सदस्य – पुंडलिक पांडुरंग सरक, (राजुरा)
सदस्य – उमेश रामराव पाटील (ढोरमाळ)
सदस्य- जाफर अली नजीर अली, (मुक्ताईनगर)
सदस्य – रमेश बाबुराव महाजन (कर्की)
सदस्य – लिलाधर तोताराम पाटील (पुरनाड)
तसेच प्रशासकिय सदस्य म्हणून मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून मुक्ताईनगर तहसीलदार अशी समिती गठित करण्यात आलेली आहे.