मुक्ताईनगर तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी, सुनील उर्फ सोनू अशोक तायडे यांची नियुक्ती !
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील शिवसेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सूचनेनुसार दुसरी पदाधिकारी निवड यादी जाहीर करण्यात आली असून यात सुनील उर्फ सोनू अशोक तायडे यांची मुक्ताईनगर तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे शिवसेना पक्ष निरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उप जिल्हा प्रमुख छोटू भोई,जिल्हा संघटक सुनील पाटील , उपजिल्हा संघटक पंकज कोळी, जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित , उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद, मुक्ताईनगर तालुका प्रमुख नवनीत पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सुनील उर्फ सोनू अशोक तायडे यांचे सोशल मीडिया व माध्यमातून अभिनंदन होत आहे.