मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती गठीत
पहा नेमकी कोणाची लागली वर्णी !
मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचेकडील शिफारशीनुसार मुक्ताईनगर तालुक्याची मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली असून यासंदर्भातील परिपत्रक दिनांक 27 जून 2022 रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून सदरिल पत्र जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांची स्वाक्षरी निशी जारी करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती खालील प्रमाणे करण्यात आल्या नियुक्त्या :
अध्यक्ष – आ.चंद्रकांत निंबाजी पाटील (विधानसभा सदस्य)
सदस्य : डॉ. जगदिश तुकाराम पाटील (काँग्रेस नेते)
सदस्य : छोटू बाबुराव भोई
सदस्य : अफसर खान मजहर खान
सदस्य : नवनीत दत्तात्रय पाटील
सदस्य : शेषराव जगदेव कांडेलकर
सदस्या : श्रीमती मंगला अशोक(हिरा शेठ) राणे
सदस्या : सौ. रुपाली दिलीप चोपडे
सदस्या : सौ. आशा राजेंद्र कांडेलकर
तसेच तहसीलदार हे पदसिद्ध सदस्य सचिव असतील.