Wednesday, July 2, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर जवळ एस टी बसचा अपघात, ८ जण जखमी  आमदारांची टीम धावली मदतीला ! 

Admin by Admin
August 5, 2024
in मुक्ताई वार्ता
0
मुक्ताईनगर जवळ एस टी बसचा अपघात, ८ जण जखमी  आमदारांची टीम धावली मदतीला ! 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुक्ताईनगर जवळ एस टी बसचा अपघात,
८ जण जखमी
आमदारांची टीम धावली मदतीला !
मुक्ताईनगर आगाराची बस , जामनेर येथून मुक्ताईनगर कडे ८ प्रवासी घेवून येत असताना  मुक्ताईनगर नर्सरी जवळ बस चालकाचे  नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना दि.५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजेच्या दरम्यान घडली
दरम्यान सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर आगाराची बस क्र MH 19 8711वरील चालक सुनिल दामोदरे, वाहक वाय एफ तांबे हे जामनेर येथून मुक्ताईनगर कडे ८ प्रवासी घेवून येत असताना मुक्ताईनगर नर्सरी जवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात  बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
सदरील घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच दोन रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिल्या तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, शहरप्रमुख गणेश टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील ,वैद्यकीय आघाडी जिल्हा प्रमुख पवन सोनवणे, नगरसेवक संतोष कोळी, पीयूष मोरे,  आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी तसेच इतर सर्व पदाधिकारी यांनी लागलीच घटनास्थळ गाठले आणि जखमी रुग्णांना ,रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणले असता सर्व रुग्णांवर प्राथमिक करण्यात आले तर दोघे गंभीर जखमी रुग्णांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
 आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमी रुग्णांची विचारपूस केली.उपचाराचा आढावा घेतला तर लागलीच भ्रमणनीवरून विभागीय नियंत्रकांशी चर्चा केल्याने बसमधील सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ १ हजार रुपयाची मदत देण्यात आली.तर दोघे गंभीर जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार केल्यास सर्व खर्च एस टी महामंडळ करणार आहे .
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMLA chandubhau patil newsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar NewsShivsenaआमदार चंद्रकांत पाटीलमुक्ताई वार्तामुक्ताईनगरशिवसेना
Previous Post

‘शिंदेंच्या शिवसेनेची लाडक्या बहिणींनी धरली वाट ! 

Next Post

धक्कादायक : ओझरखेड धरण पाणलोट बुडीत क्षेत्रात विनापरवाना क्रशर मशीन

Admin

Admin

Next Post
धक्कादायक : ओझरखेड धरण पाणलोट बुडीत क्षेत्रात विनापरवाना क्रशर मशीन

धक्कादायक : ओझरखेड धरण पाणलोट बुडीत क्षेत्रात विनापरवाना क्रशर मशीन

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group