मुक्ताईंच्या निष्ठावान वारकरी कुटुंबाने समाजासमोर ठेवला आदर्श
वेळेत लग्न परंपरा जोपासणारा जुनारे परिवाराचा ईतरांनी देखील घ्यावा आदर्श
मुक्ताईनगर : आजकाल डीजेवर नाचण्याच्या नादात आलेल्या पाहूण्यांची पर्वा न करिता उशिराने लग्न लावणारे अनेक आहेत.परंतू ठरविलेल्या मुहूर्तावरच लग्न लागले पाहीजे असे नियोजन करून लग्नवेळेची परंपरा जोपासणारे जुनारे परिवाराचा आदर्श ईतरांनी घ्यावा असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. निमित्य होते संत मुक्ताई संस्थान मुळमंदिर समाधीस्थळाचे व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे यांचे मुलीचे लग्न नुकतेच वेळेत पार पडले. सदरील लग्न सोहळा आदिशक्ति मुक्ताई च्या प्रांगणात पार पडला.
प्रत्येकजण पंचागात शुभ तिथी वेळ मुहूर्त पाहूनच लग्न ठरवितो परंतू लग्नाचे दिवशी मात्र अनेक कारणे उपस्थित करित चारचार पाचपाच तास उशिराने लग्न लावतात अशावेळी आलेल्या पाहूणे मंडळीना प्रचंड मनस्ताप होतो. उन्हा तान्हात चारदोन पोरे मद्यधुंद होवून डीजेवर नाचतांना लहानबाळासह जेष्ठांची आबाळ,घालमेल पहाण्यासारखी असते.याला अपवाद मात्र जुनारे परिवाराचा आहे मुळचे तांदूळवाडी सिध्देश्वर येथील ह्या परिवारात गेल्या तीस वर्षात एकही लग्न उशिराने लागलेले नाही. काल मुक्ताईनगर येथे दिलेल्या वेळेतच विवाह सोहळा पार पडला. लग्नपत्रीकेत वेळेवर लग्न लावण्याची टिप असल्याने पाहूण्यांचा वेळ वाचला. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी ह्या परिवाराचा आदर्श घ्यायला हवा असा सूर व्यक्त केला.ह्यावेळी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील, आमदार.चंद्रकांत पाटील,खा.रक्षा खडसे,रोहीणी खेवलकर, निवृत्ती पाटील, विनायकराव हरणे, रविंद्र महाराज हरणे,नरेंद्र नारखेडे (फैजपूर), शेखरदादा वानखेडे (सावदा), राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे, बाबूराव महाराज वाघ (पंढरपूर), परमेश्वर महाराज गोदखेकर, शिवसेना जि.उपाध्यक्ष वसंतराव भोजने नादूरा, पं स सदस्य संजयसिंह जाधव,जलमित्र रामकृष्ण पाटील,राजू काटे ,बाळू पाटील, ज्ञानदेव ढगे, हरिभक्त परायण महाराज मंडळी,राजकीय मंडळी ईष्टमित्र नातेवाईक परिवार उपस्थित होते.