Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ, रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यभर आंदोलन !

Admin by Admin
July 30, 2024
in राजकीय
0
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ, रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यभर आंदोलन !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ, रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यभर आंदोलन !

उरण, शिळ फाटा महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

 

राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या महिन्या भरात उरण आणि शिळफाटा येथे

महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खुन करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत

यामुळे राज्यात महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे

महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने

बुधवार दि 31 जुलै 2024 रोजी राज्यभरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे

याबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे आली. या योजने अंतर्गत राज्यातील पात्र माता भगिनींना दरमहा

दरमहा 1500 रूपये देण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई वाढलेले गॅस सिलेंडरचे दर यामुळे महिलांना घर खर्च भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे आता सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे त्यामुळे महिलांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे परंतु एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दर्शवनाऱ्या आहेत

यात नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे

तर दुसऱ्या घटनेत बेलापूर येथिल तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून डायघरजवळील शीळ फाटा येथिल गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे  मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी त्या महिलेला चहातून गुंगीचे औषध देऊन या महिलेवर आळीपाळीने बलात्कार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या दोन्ही घटनांमध्ये माणुसकीला काळिमा फासला गेला आहे या घटनांमुळे

राज्याचे गृह खाते निद्रिस्त असुन

राज्यात महिला असुरक्षित असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याचा अब्रु चव्हाट्यावर आली आहे

या दोन्ही घटना अमानवीय असुन निषेधार्ह आहेत या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील पाषाण हृदयाच्या आरोपींना फाशीशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे बुधवार 31 जुलै 2024 रोजी राज्यभरात तिव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्या महिला भगिनी समवेत समाजातील सर्व महिला भगिनींनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रोहिणी खडसे यांनी केले आहे

Tags: Ad Rohini ekanath khadaseJalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar NewsRohini khadase khevalakarमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

मका आयात न करण्याचा केंद्र सरकारला इशारा*- *पहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे काय म्हणाले ?

Next Post

शिवसेना पदाधिकारी संवाद दौरा, पहा कोण कोणत्या मतदार संघात असेल दौरा !

Admin

Admin

Next Post
शिवसेना पदाधिकारी संवाद दौरा, पहा कोण कोणत्या मतदार संघात असेल दौरा !

शिवसेना पदाधिकारी संवाद दौरा, पहा कोण कोणत्या मतदार संघात असेल दौरा !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group