Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

महाविकास आघाडीत बिघाडी, मुक्ताईनगर विधानसभेसाठी काँगेस आग्रही !

Admin by Admin
July 28, 2024
in राजकीय
0
महाविकास आघाडीत बिघाडी, मुक्ताईनगर विधानसभेसाठी काँगेस आग्रही !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
महाविकास आघाडीत बिघाडी, मुक्ताईनगर विधानसभेसाठी काँगेस आग्रही !
आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर काँग्रेस ची महत्वपूर्ण आढावा बैठक आज दि.२८ जुलै २०२४ रोजी मुक्ताईनगर विधानसभा निरीक्षक व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली .
यावेळी कोळी यांच्यासमक्ष विविध विषयांवर चर्चा होऊन पक्ष वाढी संदर्भात देखील चर्चा करण्यात आली तसेच  सर्व पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी एक मुखाने मुक्ताईनगर विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिळावी अशी आग्रही मागणी केली असून यावेळी इच्छुक उमेदवारांची देखील चाचपणी करण्यात येवून त्यांची मुलाखत देखील घेण्यात आली.
याप्रसंगी सदर बैठकीचे अध्यक्ष स्थानी प्रदेश काँग्रेस सदस्य डॉ.जगदीशदादा पाटील तर काँगेसचे जळगांव जिल्हा माजी अध्यक्ष उदय दादा पाटील,व्ही जे एन टी सेलचे प्रदेश प्रवक्ते ॲड अरविंद गोसावी,व्ही जी एन टी सेल जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव,मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,बोदवड तालुकाध्यक्ष भारत पाटील,रवींद्र कांडेलकर ,गुलाबराव पाटील महाराज,सौ मनीषा कांडेलकर, प्रा सुभाष पाटील,नामदेवराव भोई,राजेंद्र जाधव,निखिल चौधरी,बाळू कांडेलकर,रमेश जाधव,जे व्ही नाईक,हिरासिंग चव्हाण,गौरव पाटील, संचलाल बोराळे व असंख्य पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते.
 दरम्यान, शरद पवार यांची साथ सोडून एकनाथ खडसे यांनी सुनेच्या प्रचारासाठी भाजप मध्ये अनधिकृत(प्रश्न प्रवेश रखडलेला) रित्या प्रवेश केलेला आहे. तर त्यांची कन्या ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी शरद पवार यांच्या सोबत राहून पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदार संघात दौरे, पक्ष संघटन वाढविण्यावर भर दिलेला आहे. आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मागील काळात किमान ४ वेळेस रोहिणींची उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे. तर खडसे कुटुंबाला श्रद्धास्थान ठेवणाऱ्या विनोद सोनवणे यांनी देखील शरद पवार पक्षाकडून किंवा जो पक्ष उमेदवारी देईल तो पक्ष किंवा अपक्ष उमेदवारी लढण्याची घोषणा करून चर्चेत आलेले आहे. परंतु खडसे सांगतील ती भूमिका कदाचित ते घेवू शकतात.
दुसरीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीत काँगेस पक्षाचा परफॉर्मंस पाहता मुक्ताईनगर येथील  बैठकीतून काँग्रेसने मुक्ताईनगर विधानसभेवर केलेला दावा आणि थेट इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती  म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षात काहीच आलबेल नसल्याचे सिद्ध करीत असून मुक्ताईनगर काँग्रेसने थेट विधान सभेसाठी शड्यू ठोकल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे.
Tags: CongressJalgaon NewsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar CongressMuktainagar Newsडॉ जगदिश पाटिलमुक्ताईनगर काँग्रेस
Previous Post

धक्कादायक : मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कचऱ्याचे ट्रॅक्टर घुसले घरात !

Next Post

मका आयात न करण्याचा केंद्र सरकारला इशारा*- *पहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे काय म्हणाले ?

Admin

Admin

Next Post
मका आयात न करण्याचा केंद्र सरकारला इशारा*-  *पहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे काय म्हणाले ?

मका आयात न करण्याचा केंद्र सरकारला इशारा*- *पहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे काय म्हणाले ?

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group