*महाराष्ट्र सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टचा अंतरीम निकाल/महत्वाचे मुद्दे:*
👇👇👇
आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्तनेवमहत्वाच्या टिप्पण्या करून निकाल दिला असून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जरी ४ महत्त्वाचे निर्णय लागले असले तरी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा सत्तेत आणता आले असते अशी महत्त्व पूर्ण टिप्पणी जोडत महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणविस सरकार कायम राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला असून 16 आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करण्याच्या चेंडू देखील विधान सभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.
पहा कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण , निकाल व मुद्दे
*१) महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडवीस सरकारच कायम सुप्रीम कोर्टाचा निर्णय.*
*२) उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळेच भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा राज्यपालांना निर्णय योग्य ठरतो.*
*३) आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयात हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. आम्ही 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेणार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा. मात्र सुप्रीम कोर्ट कडून अंतिम वेळ (डेडलाईन) देण्यात आली नाही.*
*४) उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून दिलेला राजीनामा परत मागे घेऊ शकत नाही. कारण उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांचा राजीनामा सादर केला होता.*
*५) खरी शिवसेना कोणती? ह्याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा.*
*६) राज्यपालांनी राज्यघटनेतील अधिकारांच्या आत राहूनच निर्णय घ्यायला हवे.*
*७) अपात्रतेसंदर्भातली नोटीस बजावलेली असतानाही कोणताही आमदार सभागृहाच्या कामकाजाच सहभागी होऊ शकतो. त्यामुळे सभागृहात झालेल्या कामकाजाची वैधता आमदारांच्या अपात्रतेबाबत होणाऱ्या निर्णयावर अवलंबून असू शकत नाही.*
*८) विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.*
*९) शिंदे गटाकडून भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नेमणूक बेकायदेशीर.*
*१०) व्हीप फक्त राजकीय पक्षच देऊ शकतो.*
*११) नबम रेबिया प्रकरणातील तरतुदी इथे लागू होतात की नाही याचा निर्णय 7 सदस्यीय मोठ्या खंडपीठासमोर होईल.*