Wednesday, July 2, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

महत्त्वाची घोषणा ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा मोठा दिलासा !

Admin by Admin
July 2, 2024
in मुक्ताई वार्ता
0
महत्त्वाची घोषणा !  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा मोठा दिलासा !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महत्त्वाची घोषणा !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा मोठा दिलासा !

पहा विधानसभेत बोलताना अजित पवार काय म्हणाले ? व्हिडिओ पाहण्यासाठी येथे Click Here 

राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांनी दि.२९ जून रोजी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. परंतु यात अधिवास दाखल्याची अट असल्याने मुक्ताईनगर मतदार संघ हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमारेषेवर सदरील महिलांना अधिवास दाखला मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे त्या महिला या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहू शकतात याकरिता सदरील योजनेतील अधिवास दाखल्याची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्राद्वारे केली होती. व मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून यासंदर्भात गाऱ्हाणे देखील मांडले होते. या या पाठपुराव्याला यश आले असून आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी पुन्हा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक शिथीलता जाहीर करून पुन्हा आनंदाची बातमी दिली.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन करताना ते म्हणाले की,

 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो-

 

१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

 

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

 

३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

 

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

 

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

 

६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

 

७. सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Tags: Ajit dada pavarBjpDevendra FadanavisEknath shindeMaharashtraMaharashtra'sMahayutiMazi ladaki bahin yojanaMLA Chandrakant PatilMukhyamantri Mazi ladki bahin yojanaNcpShivsena
Previous Post

शिवसेनेतर्फे मुक्ताईनगर येथे डॉक्टर्स-डे साजरा !

Next Post

मंडळे निहाय शिबीर घेण्यात यावे – आ.चंद्रकांत पाटील 

Admin

Admin

Next Post
मंडळे निहाय शिबीर घेण्यात यावे – आ.चंद्रकांत पाटील 

मंडळे निहाय शिबीर घेण्यात यावे - आ.चंद्रकांत पाटील 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group