मध्य प्रदेशातून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारा अवैध गुटखा पकडला, मुक्ताईनगर येथे चौघांवर अटकेच्या कारवाईसह ३५.५ लाखाचा मुद्देमाल जप्त
मुक्ताईनगर : मध्यप्रदेशातून छ्त्रपती संभाजीनगर कडे जाणारा महामार्ग मुक्ताईनगर शहरातून जात असल्याने या मार्गाने छ्त्रपती संभाजीनगर चे काही तस्करांद्वारा अवैध गुटखा तस्करी करण्याचा प्रकार प्रकार वाढल्याचे दिसून येत असून आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या वाहनाच्या तपासणी किंवा छापे मारीतून लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत केल्याचे दिसून येत असून आज शुक्रवारी पुन्हा एकदा अवैध गुटखा तस्करी समोर आली असून अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहना सह सुमारे ३५.५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आली आहे.तस्करी इतर जिल्ह्यातील सापडून येत असली तरी स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा पोलिस प्रशासन मात्र माजी मंत्री आ एकनाथ खडसेंच्या रडार वर दिसून येत आहे.
शुक्रवारी पहाटे अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव येथील पथकाने मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूरच्या दरम्यान पूर्णा नदीच्या जवळ प्रतिबंधीत गुटखा, सुगंधी मसाला आणि तत्सम सामग्री एमएच २० ईएल ५८४९ आणि एमएच २० १७३७ या क्रमांकांच्या दोन वाहनांमधून वाहतूक करत असताना ३५ लाख ५२ हजार रूपये मूल्याचा ऐवज जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहन चालक शकील रशीद शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) व क्लीन फैजान इम्रान काचालिया (रा. छत्रपती संभाजीनगर) तसेच दुसऱ्या वाहनाचा चालक शेख मोहसीन शेख ईस्माईल व क्लीनर शेख फरहान शेख शाहनवाज यांच्यासह जळगाव येथील सुशील रमेश गेही आणि बऱ्हाणपूर येथील साईनाथ ट्रेडर्सचा संचालक आशीष बुधराणी यांच्या विरोधात भादंवि कलम १८८, २७२, २७३; ३२८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील चार संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. मात्र अवैध गुटखा तस्करीबाबत नेहमीच ओरड होत असताना स्थानिक मुक्ताईनगर येथील गुटखा तस्कर मात्र अद्याप पावेतो मोठ्या कारवाई अडकले नसल्याने स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून अन्न व औषध प्रशासनाच्या डोळ्यात देखील काजळ गेले की काय अशी चर्चा आहे.