मक्का मदिना उमराह साठी जाणाऱ्या भाविकांचा रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय,मुक्ताईनगर तर्फे सत्कार
मुक्ताईनगर(प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथील सिड फार्म मधील रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय तर्फे शहरातून इस्लाम धर्मांमधील पवित्र ठिकाण मक्का मदीना येथे उमराहा साठी जाणारे एकूण चार लोकांचे सत्कार करण्यात आले.
सविस्तर वृत असे की,रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय चे अध्यक्ष हकीम चौधरी हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहूणे म्हणून वाचनालय चे सचिव कलीम मणियार, खजिनदार अहमद ठेकेदार, राष्ट्रीय मराठा वस्तीगृह चे सचिव शिवश्री दिनेश कदम, तसेच डॉ. दिलीप भास्कर तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरच्या कार्यक्रमा मध्ये हज यात्रा व उमराहा बाबत थोडक्यात माहिती म्हणून वाचनालय चे अध्यक्ष हकीम चौधरी यांनी सांगितले की,मुस्लीम धर्मां मधील प्रमुख पाच तत्व असून त्यात एक उमराहा व हज आहेत. त्यात पहिला तत्व *शाहादा* हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ होते की ईश्वर अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पेंगांबर साहेब यांचे वर आस्था ठेवणे. दुसरा तत्व *नमाज* पठण करणे अल्लाह समोर दिवसातून पाच वेळा नतमस्तक होणे. तिसरा तत्व *रोजा(उपवास)* वर्षातून पवित्र रमजान महिन्यात 30 दिवसाचे उपवास(रोजा) ठेवणे हे आहेत. चौथा तत्त्व *जकात* आपल्या संपती मधून अडीच टक्के रक्कम हे गरीब, लाचार, विधवा, येतीम यांचे वर खर्चा करणे हे होते. आणि पाचवा तत्त्व हा *हज उमराहा* करणे हे होते. हज हे प्रत्येक श्रीमंत माणसावर फर्ज आहे. त्यांनी कमीत कमीत आयुष्यातून एकदा तरी हज या पवित्र यात्रेला जावे.त्या प्रमाणे *उमराहा* याचा अर्थ छोटा हज हे होय हे पवित्र यात्रा सऊदी अरेबिया मध्ये मक्का मदीना ह्या ठिकाणी होते या साठी रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय चे सह सचिव अब्दुल रफिक मजीद मणियार व त्यांची पत्नी शकीला बी शेख रफिक, तसेच हुसैन कुरैशी, मोहम्मद शेख (मापारी)असे एकूण 4 भाविक पवित्र यात्रेला जात असून त्यांचे रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आले, सदर कार्यक्रमात हारून मेंबर, समद ठेकेदार, दिनेश कदम, डॉ. दिलीप तायडे, मणियार मस्जिद चे मौलाना मुबशीर अहमद, हाजी लाल खा ब्रोकर,हे होते, सदर कार्यक्रम यशवीसाठी रिजवान चौधरी यांनी प्रयत्न केले व आभार शेख कलीम मणियार यांनी मानले.