आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा ठरला यशस्वी !
बोदवड नगरपंचायत अंतर्गत तलावाचे पुनरुज्जीवनासाठी 1.85 कोटी रुपये मंजूर !
मुंबई : अमृत २.० अभियानांतर्गत बोदवड नगरपंचायतच्या गाव तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्पास .(रु. १.८५ कोटी) प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून यामुळे या तलावाचे बंद पडलेले नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पुनरुज्जीवित होतील.तसेच परिसरातील शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येईल व शहराच्या सौंदर्य करणात भर पडेल अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.
अमृत २.० अभियानांतर्गत बोदवड नगरपंचायतच्या गाव तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्पास .(रु. १.८५ कोटी) प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने यासंदर्भात महाराष्ट्र शासन,नगर विकास विभाग,शासन निर्णय क्रमांक अमृत-२०२३/प्र.क्र.९९/नवि-३३,मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : १७ मार्च, २०२३ अन्वये शासनाचे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे.