प्रशांत टाँगे : मुक्ताईनगर च्या राजकीय पटलावरील एक सच्चा समाजसेवा व्रती व आरोग्य दुत !
वाढदिवस विशेष लेख
मुक्ताईनगर : प्रशांत उर्फ गणेश टोंगे एक सर्व सामान्य कुटुंबातील होतकरू तथा मेहनती नव उमेदीचा तरुण राजकारणी व्यक्तिमत्त्व असलेला आमदार चंद्रकांत पाटील यांचा कणखर शिलेदार होय.
तसे पाहता इतर राजकीय पदाधिकारी यांचे प्रमाणे यांच्याकडे ही शिवसेना पक्षचे शहर प्रमुख पद ,परंतु या पदाला न्याय देते ते यांचे समाज सेवेप्रती असलेले प्रामाणिक कार्य , कारण हा अगदी कमी वयाचा तरुण २४ तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतो. कोणाचे पोलिस स्टेशन , तहसील कार्यालयातील किंवा पंचायत समितीतील किंवा इतर शासकीय कार्यालयातील कुठलेही काम अडले असेल तर त्याला केवळ पर्याय प्रशांत टोंगे होय, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कामाची शैली त्यांच्या कडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस अनुभवास येते ज्याचे काम अडले असेल त्याचे जागच्या जागून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून तात्काळ कामाच्या सूचना असतात . व यानंतर त्या कामांचा पाठपुरावा घ्यायची जबाबदारी ही त्या त्या पदाधिकाऱ्यांवर येताच आलेल्या व्यक्तीचे अडलेले काम झालेच पाहिजे हा इथला होराच असतो. मात्र याही पलीकडे त्यांचा एक शिलेदार प्रामाणिकपने लोकांच्या मदतीला धावून जातो म्हणजेच गणेश टोंगे होय.त्यांचा आज वाढदिवस म्हणून प्रोत्साहनपर दोन शब्द मुक्ताई वार्ता तर्फे …
एक सच्चा समाज सेवाव्रती ते आरोग्य दुत अशी ओळख :
तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन , पंचायत समिती, कृषी कार्यालय, वीज वितरण कंपनी कार्यालय , भुमी अभिलेख कार्यालय , शिक्षण विभागाचे कार्यालय अशा विविध कार्यालयात जावून आमदार चंद्रकांत पाटील यांचा हा शिलेदार सर्व सामान्यांचा आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी सच्चा असल्यामुळे सेवाव्रती ठरला आहे.यासह गर्भवती माता भगिनी असतील, किंवा स्त्रियांच्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया असतील , कोणाला रक्ताची अडचण असेल यासाठी आरोग्य दुत म्हणून २४ तास उपलब्ध असेल तर तो फक्त गणेश टोंगे, सोबतच अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी अखंड सेवा देणारा सदैव हजर असलेला कार्यकर्ता अशी ओळख त्याने निर्माण केली. असून आज घडीला तो आरोग्य दुत म्हणून अहोरात्र काम करतोय. त्याच्या याच कामाची तळमळ पाहून आमदार चंद्रकांत पाटील यांनी गणेश ची निवड उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समिती वर केलेली असून या माध्यमातून त्याचे काम प्रामाणिकपने सुरू आहे. नव्हे नव्हे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी महिन्याच्या दर बुधवारी दिव्यांग तपासणी शिबीर उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे सुरू केले असून या शिबिरात पूर्णवेळ थांबून तेवसेवा देत असतात. आणि वृद्ध नागरिकांना वयाच्या दाखल्यासाठी जळगाव येथे फरफट होत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही समस्या देखील निकाली काढली असून वयाचे दाखले देखील मुक्ताईनगर येथेच उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होत असल्याने या कार्यात देखील ते निकटवर्तीय संतोष माळी, मनोज मराठे, योगेश घुले व इतर असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा देत असतात. अशा या सच्चा समाज सेवा व्रती व आरोग्य दुतास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आई मुक्ताई प्रशांत उर्फ गणेश टोंगे यास उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच मुक्ताई चरणी प्रार्थना !