पोकरा योजनेची बंद पडलेली वेब साईट तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे पूर्व संमती अर्ज स्वीकारावे – आमदार चंद्रकांत पाटील
राज्याचे कृषी मंत्री ना. अब्दुलजी सत्तार यांच्याशी केली सकारात्मक चर्चा
मुंबई: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत पोकरा प्रकल्प राज्यभर राबविला जात असतो या प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक उदा. वृक्षारोपण,फळबाग लागवड,पॉली हाऊस,शेड नेट हाऊस ,पॉली हाऊस/शेड नेटसह फ्लॉवर/भाजीपाला लागवड ,रेशीम,मधमाशी पालन,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन,इतर कृषी आधारित उद्योग,गांडूळ खत युनिट,नाडेप कंपोस्ट,सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट ,शेततळे,फील्ड अस्तर,विहिरी ,ठिबक संच,फ्रॉस्ट संच,पंप संच,पाइपलाइन आदींसाठी तसेच ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्व संमती चे अर्ज वेब साईट वरून आँनलाईन करावे लागतात परंतु ही वेबसाईटच बंद असल्याने शेतकरी वर्ग सदरील पोकरा योजनेपासून वंचित राहत असून त्यांना सदरील योजनेचा लाभ घेता येत नसल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात सुरू असलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत दिली व यानंतर राज्याचे कृषी मंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या दालनात याबाबत सखोल चर्चा करून पोकरा योजनेची वेब साईट तात्काळ सुरू करून पूर्व संमती प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती केली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार कृषि मंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी सकारात्मक चर्चा करून तात्काळ वेब साईट सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कृषी विभागाचे सचिव तसेच इतर अधिकारी यांचेसह प्रा.हितेश पाटील व मुक्ताईनगर मतदार संघातील अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते .