पिक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना कमी व अधिक तापमान नुकसानी मुळे मिळणार दुहेरी लाभ – आ.चंद्रकांत पाटील
कमी तापमान नुकसान मुळे प्रति हेक्टर मिळणार रु.२६,५००/- तर जास्त तापमान नुकसान मुळे रू.३६,०००/- प्रति हेक्टर लाभ मिळणार
पुनर्रचित हवामानावर आधारित *“फळ पिक विमा योजना आंबिया बहार”* सन २०२३-२४ मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की *दि.१ ते ३० एप्रिल* या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळात *सलग ५ दिवस तापमान ४२ डिग्री व त्यापेक्षा जास्त* राहिल्याने; केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असुन सदर शेतकऱ्यांना *रु.३६,०००/-* प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे.
तसेच या पूर्वी *१ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४* या कालावधीत जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळात *सलग ३ दिवस ८ डिग्री व त्यापेक्षा कमी* तापमानामुळे प्रति हेक्टर रक्कम *रु.२६,५००/-* अशी नुकसान भरपाई आधीच मंजूर झाली असून, लाभ लवकर मिळणेसाठी योग्यतो पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती *आ.चंद्रकांत पाटील* यांनी दिली
जास्त तापमान मुळे नुकसान भरपाईस पात्र मुक्ताईनगर मतदार संघातील महसूल मंडळे खालील प्रमाणे.
1. बोदवड : बोदवड, नाडगाव.
2. मुक्ताईनगर : अंतुर्ली, घोडसगाव, कु-हे, मुक्ताईनगर.
3. रावेर : ऐनपुर, खानापूर,खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा.
कमी तापमान मुळे नुकसान भरपाईस पात्र मुक्ताईनगर मतदार संघातील व महसूल मंडळे खालील प्रमाणे.
1. बोदवड : बोदवड, करंजी
2. मुक्ताईनगर : अंतूर्ली घोडसगाव, मुक्ताईनगर
3. रावेर : खानापूर, खिर्डी बु., निभोरा बु., रावेर, सावदा