मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री पंचम (धाबे) येथील पुरातन भवानी माता मंदिर हे देवस्थान दुर्गम पहाडातील पोकळ बरड मध्ये असून येथे नवसाला पावनारी जागृत भवानी माता अशी भाविकांत प्रचंड श्रद्धा असल्याने येथे मध्यप्रदेश, जळगाव व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच आश्विन नवरात्र व चैत्र नवरात्रीत येथे भाविकांची प्रचंड वर्दळ असते. येथे भाविकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने या मंदिराला “क” वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे आज दि.१७ जून २०२२ शुक्रवार रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्रव्यवहार करून मागणी केल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बैठकीत मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री पंचम (धाबे) येथील प्राचीन भवानी माता मंदिर या देवस्थानास