Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

नवरात्री स्पेशल

श्री.भगवती देवीची पावरफुल आरती "अश्विन शुद्ध शुक्लपक्षी" 

Admin by Admin
September 26, 2022
in मुक्ताई वार्ता
0
नवरात्री स्पेशल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवरात्री स्पेशल :

श्री.भगवती देवीची आरती “अश्विन शुद्ध शुक्लपक्षी”

इसवी सन १६०० च्या शतकात समर्थ रामदास स्वामी यांनी आई भगवती ला प्रसन्न करण्यात एक सुंदर आरतीची काव्य स्वरूपात रचना केली. याच आरतीच्या माध्यमांतून त्यांनी सप्तशृंगी मातेला प्रसन्न केल्याची अख्ययिका आहे. आजही याच आरती व्दारे भगवती ची उपासना केली जाते.

मुक्ताई वार्ता वाचकांसाठी खालील प्रमाणे संपूर्ण आरती 

अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो । ब्रह्माविष्णू रुद्र आ‌ईचे करीती पूजन् हो ॥१॥

उदो बोला उदो बोला अंबाबा‌ई मा‌ऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो । मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासका पहासी प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे पहासी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या मा‌ऊली सूर ते येती लोटांगणी हो ॥४॥

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो । आर्धपाद्य पुजनें तुजला भवानीस्तविती हो
रात्रीचे सम‌ई करिती जागरण हरि कथा हो । आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रिडता हो ॥५॥

षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो । घेवुनी दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली मुक्ताफळा हो ॥६॥

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
शेवंती जा‌ईजु‌ई पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो ॥७॥

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो । संह्याद्री पर्वती उभी पाहिली जगत्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो । स्तनपान दे‌ऊनी सुखी केले अंत:करणी हो ॥८॥

नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो । सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्ने नैवेद्याशी अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा तृप्त त्वा केले कृपे करुनी हो ॥९॥

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंव्हारुढ संबळ शस्त्रे अंबे त्वा लेवुनी हो
शुंभनिशूंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । विप्ररामदासा आश्रय दिधला चरणी हो ॥१०॥

Previous Post

आदिशक्ति संत मुक्ताई साहेबांचा घटस्थापना दिनी मोठ्या उत्साहात पारायण व पुष्पवृष्टीने साजरा झाला जन्मोत्सव !

Next Post

बहुप्रतिक्षित मुक्ताईनगर MIDC ला शिंदे – फडणवीस सरकार कडून तत्वतः मंजुरी !

Admin

Admin

Next Post
बहुप्रतिक्षित मुक्ताईनगर MIDC ला शिंदे – फडणवीस सरकार कडून तत्वतः मंजुरी !

बहुप्रतिक्षित मुक्ताईनगर MIDC ला शिंदे - फडणवीस सरकार कडून तत्वतः मंजुरी !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group