नदीपात्रातील गाळ उपसा करणाऱ्या शेतकरी बांधव व कुंभार समाजाच्या वाहनांवर होत असलेल्या निषेधार्ह कारवाई तात्काळ थांबवा अन्यथा दि.१७ जून रोजी आंदोलनाचा इशारा
आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला लेखी पत्राद्वारे इशारा
मुक्ताईनगर : सद्यस्थितीत शेतकरी राजा पेरणी पूर्व मशागती साठी जीवापाड मेहनत घेत आहे. तसेच नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असल्याने या काळात नदीपात्रातील गाळ उपसा केला जातो. आणि शासनाचे धोरण असल्याने नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते जेणेकरून जास्तीत जास्त गाळ उपसा झाल्यास नदीपात्र असतील किंवा तलाव. बंधारे असतील यात खोलीकरण झाल्याने भूजल पातली वाढण्यास मदत होते. यासाठी शेतकरी बांधव जमिनीची पोत सुधारण्यासाठी तसेच कुंभार समाजातील अनेक कुटुंब जे उदर निर्वाहासाठी विटा बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय करीत असतात त्या कुंभार समाजाकडूनही गाळ काढण्यात येतो.
नदीपात्र गाळमुक्त करणे शासनाचे धोरण असल्याने तापी पूर्णा नदी पात्र गाळमुक्त करणेसाठी लघु पाटबंधारे विभाग रीतसर परवानगी देत असतांना रावेर व मुक्ताईनगर महसुली अधिकाऱ्यांतर्फे गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मनमानी कारवाया सुरु असून शेतकरी व कुंभार समाजातील लोकांना अन्याय कारक दंडाचा भुर्दंड देण्यात येत आहे. हा प्रकार निषेधार्थ असून तात्काळ सदरील कारवाया थांबविण्यात याव्यात अन्यथा येत्या दि. १७ जून रोजी सकाळी ११ वाजेला आपले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे लेखी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांना दि.१४ जून रोजी दिले.