धक्कादायक वाढदिवशी दुर्दैवी अंत, कुलर चा शॉक बसल्याने बालिकेचे दुर्दैवी निधन
मुक्ताईनगर येथील जिजाऊनगर प्रभाग क्र १२ मधील घटना
मुक्ताईनगर : ९ वा वाढदिवस असल्याने सायंकाळी सर्व कुटुंबीय बालिकेचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करीत असताना आज शुक्रवारी १९ मे २०२३ रोजी सायं ६:३० वाजेच्या सुमारास कुलर चा जबरजस्त शॉक बसल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रं.१२ मधील जिजाऊ नगर मध्ये घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैष्णवी चेतन सनान्से, हिचे आज कुलरचा शाॅक लागुन दुर्दैवी निधन झाले, परमेश्वर बालिकेच्या आत्म्याला शांती देवो, श्री गोपाळ बळिराम सनान्से रा. चिचोंल ह. मु. मुक्ताईनगर नात होती. परमेश्वराने आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काळाने घात केला, वैष्णवी ची अंतिम यात्रा रहाते घर जिजाऊ नगर, मुक्ताई नगर येथुन उदया. दिनांक 20/5/2023 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता निघणार आहे. परमेश्वर वैष्णवी च्या आत्म्याला चिर शांती देवो.सदरील बालिका ओम साई सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.सुभाष सनान्से यांची पुतणी तर श्री.चेतन महाराज (अंत्यविधी,भजनी मंडळ) याची कन्या होती.