तरोडा येथील संजना हिवरकर हिने पटकवले गोल्ड मेडल
मुक्ताईनगर….
19 वी नॅशनल सिलंबम चॅम्पियनशिप 2022-23 अय्यान केंद्र सीबीएसई स्कूल, राजपलयम, तामिळनाडू येथे 24 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान झाली. या स्पर्धेत ठाणे येथील सेंट लॉरेन्स हायस्कुलची विद्यार्थिनी संजना गजानन हिवरकर हिने भाला फिरवणे क्रिडा प्रकारात सुवर्ण (गोल्ड) पदक प्राप्त केले. तिच्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि शाळेतील शिक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे. संजना हिवरकर ही विद्यार्थिनी मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथील मूळ रहिवासी आहे.