डोलारखेडा गावाच्या पुढे दरोडा घालणारे सहा जण अटकेत
मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई
मुक्ताईनगर : : मुक्ताईनगर- कुन्हा रस्त्यावरील वायला फाट्याजवळ सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास दरोडा टाकणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधील सहाजणांना मुक्ताईनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
२८ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वायला फाट्याजवळ पांढऱ्या रंगाची कार (एमएच०२/बीझेड८९३८) मधील सहा अज्ञातांनी देविदास रामदास तायडे (४०, चिंचखेडा बुद्रुक, ता. मुक्ताईनगर) याच्या रिक्षाच्या बाजूला आपली कार उभी करून त्यांना रस्त्याबाबत विचारपूस केली. त्यातील दोघांनी तायडे यांची रिक्षा पकडून त्यांना खाली ओढले. तसेच कारमध्ये बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. तायडे हे त्यांच्या तावडीतून सुटकेसाठी प्रयत्न करताना त्यांच्या शर्टाच्या खिशातील सोळाशे रुपये व मोबाईल आरोपींनी जबरीने काढून घेतले.
यावेळी तायडे यांना सर्वांनी लाथाबक्क्यांनी मारहाण करून आरोपींना केली अटक त्यांच्या कारने पूर्णाड फाट्याच्या रस्त्याने पळून गेले. यासंदर्भात तायडे यांनी गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून पुर्णाड फाट्याजवळ दोन ट्रक आडवे लावून पोलिसांनी नाकाबंदी केली. सुसाट वेगाने धावत येणारी ही कार अडवून त्यातील सहाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपास पोलीस निरीक्षक राहुल बोरकर करत आहेत. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३९४, ३९५ प्रमाणे दरवाजा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांना केली अटक
हुसेन गुलाम रसूल शहा (२१), शेख समीर शेख शकील (२०), फैयाज खान रियाज खान (२०), शेख तौसीफ शेख शकील (२०), रिजवान शहा रफिक शहा (२०), आमिर खान शब्बीर खान (२१, सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक) यांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.