ज्वारी खरेदीला अडथळा ठरणारी ऑनलाईन ई-पिक पेरे ठरतेय डोकेदुखी, ऑफलाईन नोदणी करा – आ.चंद्रकांत पाटील
सद्यस्थितीत सुरु असलेली ऑनलाईन ई-पिक पेरे नोंदणी मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता,तसेच ई पीक पेरे असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदीला अडचण निर्माण झाल्याने सदरील ई-पिक पेरे नोंदणी ऑफलाईन पद्धतीने नोंदविण्यात यावी अशी मागणीचे पत्र आ.चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे.
सद्यस्थितीत ई-पिक पाहणी या शासनाच्या अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांचे ई -पिक पेरे नोंदणी केले जात असतात. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पिक पेरे नोंदवितांना अडचणी निर्माण होत आहे. त्यातच शासनाच्या भरड धान्य खरेदी केंद्रांवर सद्य स्थितीमध्ये ज्वारी या पिकाची शासनातर्फे खरेदी सुरु असून सदरील खरेदी केंद्रावर ७/१२ वर ज्वारीचा पिक पेरा असल्याशिवाय ज्वारी खरेदी केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच शेतकरी अस्मानी तुफानी संकटांनी हवालदिल झालेला असल्याने त्यात तांत्रिक अडचणींमुळे पिक पेरे मांडले न गेल्यामुळे ज्वारी खरेदी होत नसल्याने बळीराजाची मोठी अडचण होत आहे.
सद्यस्थितीत सुरु असलेली ऑनलाईन ई-पिक पेरे नोंदणी मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता सदरील ई-पिक पेरे नोंदणी ऑफलाईन पद्धतीने नोंदविणेसंदर्भात आपले स्तरावरून उचित ती कार्यवाही करण्यात यावी असे आ.चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.