ज्ञानपूर्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये वकृत्व स्पर्धा संपन्न- गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण
मुक्ताईनगर तालुक्यातील इच्छापुर निमखेडी बुद्रुक येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी डी बारी हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्रदीप पाटील, प्रा मनोज भोई, बाळासाहेब देशमुख, वकृत्व स्पर्धा प्रमुख विनायक वाडेकर उपस्थित होते.
परीक्षक म्हणून बी के महाजन व मीनल कोल्हे यांनी काम पाहिले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र तायडे यांनी तर आभार प्रा.मनोज भोई यांनी मानले.
तीन गटात झालेल्या या वकृत्व स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे….
इयत्ता 5वी ते 7वीच्या गटातून आचल गणेश बेलदार प्रथम, गायत्री गणेश खिर्डेकर द्वितीय व अर्चना विनोद सोनवणे हिला तृतीय पारितोषिक देण्यात आले. इयत्ता 8वी ते 10वीच्या दुसऱ्या गटातून प्रथम रोशनी कैलास तांदळे, द्वितीय वैष्णवी दिगंबर पाटील आणि तृतीय पारितोषिक अर्पिता विजय साळुंखे या विद्यार्थिनींना मिळाले. इयत्ता 11वी व 12वी या तृतीय गटातून प्रथम पारितोषिक मनीषा सुभाष गणगे, द्वितीय पारितोषिक चेतन भगवान भोंगरे आणि तृतीय पारितोषिक शैलेश मारुती पवार या विद्यार्थ्याला मिळाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजिंक्य पाटील, विनोद पाटील,गोपाळ सपकाळ, बेबाबाई धाडे, रेणुका लोणे यांनी प्रयत्न केले.