ज्ञानपूर्णा विद्यालयात निरोप समारंभ विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शाळेसंदर्भात ऋण
मुक्ताईनगर
तालुक्यातील इच्छापुर निमखेडी बुद्रुक येथील ज्ञानपूर्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केलेला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस ए भोईसर हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, केंद्रप्रमुख संतोष धनगर,पंकज कोळी, इच्छापुर गावचे सरपंच गणेश थेटे निमखेडी बुद्रुक गावच्या सरपंच शितल सोनवणे, चेअरमन अनिल वाडीले, उपाध्यक्ष पू.स.धायले, सेवानिवृत्त फौजदार डी डी कुलकर्णी, सुषमा सोनटक्के,माजी प्राचार्य आर एस कांडेलकर, प्राचार्य बी डी बारी, मुख्याध्यापक श्री बोरोले, श्रीकृष्ण सपकाळ, नामदेव मिठाराम भोई,विद्या मंडपे ,प्रा. सुभाष पाटील,प्रा.मनोज भोई हे प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी गायत्री येरुकार, गायत्री भोंगरे, आरती भोई, माधुरी हानोते, सुपेश बहुरुपे, सचिन ठाकरे, स्नेहल आढाव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या संदर्भात आपले ऋण व्यक्त केले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणाचे बाजारीकरण होऊ नये असे सांगत ग्रामीण भागात कला गुण विद्यार्थ्यांमध्ये ठासून भरलेले असल्याने गुणवत्ता ओळखून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे गरजेचे आहे. शिक्षकच विद्यार्थी घडवू शकतात व भविष्यातील सुजान नागरिक निर्माण करून देश सेवेसाठी पुढे आणू शकतात असे सांगत मुलींनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य बी. डी. बारी यांनी प्रास्ताविक, ईशस्तवण प्रा.विद्या मंडपे यांनी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वाडेकर यांनी तर आभार महेंद्र तायडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ आशा कांडेलकर, बी के महाजन, गणेश पवार, पी एम पाटील, गोपाळ सपकाळ, विनोद पाटील, बेबाबाई धाडे यांनी सहकार्य केले.
फोटो कॅप्शन
ज्ञानपूर्ण विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित याएस. ए .भोई व इतर