जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि संस्कार ऊर्जा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने,
“पॉक्सो कायदा” या विषयावर बेंडाळे महाविद्यालयात जनजागृती
जळगाव : बेंडाळे महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि संस्कार ऊर्जा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “पॉक्सो कायदा” या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे 80 मुली व 12 प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार काय आहे ? आणि त्याची शिक्षा काय आहे ? याची सविस्तर माहिती ॲड सौ.प्रतिभा पाटील यांनी दिली.
तसेच सामाजिक काम करताना जे अनुभव मिळालेले आहे त्या अनुभवांची सविस्तर माहिती, संस्कार ऊर्जा सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. सपना श्रीवास्तव यांनी दिली.

यावेळी संस्थेचे सदस्य योगानंद कोळी यांचे सौजन्यातून कायद्याविषयी माहिती पत्रक वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींना कायद्याचे सखोल ज्ञान व्हावे म्हणून बेंडाळे महाविद्यालयातर्फे पुढाकार घेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यासाठी प्रा.अनिल बेलसर आणि प्रा .आर. एस कोष्टी यांचे विशेष सहकार्य लाभले.

सध्या लैंगिक अत्याचार च्या घटनांमध्ये वाढ झाली असून महिला व मुलींना समाजात वावरणे कठीण झालेले आहे.दर दिवसाला यासंदर्भातील गुन्ह्यामध्ये वाढ होत असून यासंदर्भात जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक मुलींना या कायद्याची माहिती तसेच जनजागृती व्हावी यासाठी “जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून स्कूल, कॉलेजेस या सर्व ठिकाणी लोकांना अवरनेस कार्यक्रम घेतला जातो. आणि त्यांच्याद्वारा पूर्ण जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम राबविला जात असून मुलींचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे.तसेच प्रत्येक मुलीला त्यांचे संरक्षणार्थ असलेले कायदे आणि त्या माध्यमांतून संरक्षण कसे केले जावू शकते याबद्दल सखोल माहिती व्हायला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती संस्कार ऊर्जा सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. सपना श्रीवास्तव यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी सेवा सहकारी योगानंद कोळी, सपना श्रीवास्तव , ॲड.प्रतिभा पाटील , आर एस कोष्टे , अनिल बेलसर आणि बेंडाळे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुनिता पाटील व महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले.


