चिखली ता. बोदवड कन्येची गरुड झेप , भारतीय नौदलात नियुक्ती !
आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला सत्कार
मुक्ताईनगर : बोदवड तालुक्यातील चिखली येथील कन्येने गरुडझेप घेतली असून तिची निवड भारतीय नौदलात झालेली आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून या कन्येचा सत्कार आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.
मुक्ताईनगर मतदारसंघातील चिखली ता- बोदवड येथील कु. वैशाली ज्ञानेश्वर पाटील असे या विद्यार्थीनीचे नाव असून भारतीय नौदला मध्ये निवड झाली असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असून या कन्येचा आमदारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रसंगी सोबत बोदवडचे माजी उप तालुका प्रमुख दिपक माळी , माजी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, गणेश पाटील, अनिल पाटील,अमोल पाटील , रविंद्र वाघडे, सुभाष माळी , नामदेव सुशिर ,उमेश पाटील ,रविन पाटील, प्रदीप वाघ, छोटु पाटील ,विजु पाटील, दिलिप मालठाणे आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
(साभार : बातमी व नावे ,आमदार चंद्रकांत एन पाटील फेसबुक पेज वरून)