Sunday, September 14, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण : मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष भैयासाहेब ॲड. रवींद्र पाटील यांचाही सहभाग

Admin by Admin
January 1, 2023
in जळगाव
0
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण : मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष भैयासाहेब ॲड. रवींद्र पाटील यांचाही सहभाग
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण : मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष भैयासाहेब ॲड. रवींद्र पाटील यांचाही सहभाग
मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताई समाधी स्थळी श्री. सदगुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा समिती पंढरपूर व संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर (समाधीस्थळ) द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व निरूपण तसेच भव्य कीर्तन महोत्सव सोहळा सुरू असून येथे ह भ प श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृततुल्य वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण व निरूपण सेवा सुरु आहे. येथे पारायणाला हजारो भाविक (महिला व पुरूष) बसलेले आहेत. येथे अतिशय श्रध्देने व एकाग्रतेने येथे पारायण होत असून या पारायणात मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष भैयासाहेब ॲड. रवींद्र पाटील देखील सहभागी झालेले आहेत.

मानवी जीवन हे संगप्रधान आहे. प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा संग अपेक्षित आहे. संगरहित जीवनाची माणूस कल्पनाही करु शकत नाही. केवळ माणसानेच नव्हे तर तात्विक दृष्टीने विचार केला तर ब्रह्मालाही एकट्याने करमले नाही. ‘स एकाकी न रमते’ असे उपनिषिदही म्हणते.म्हणून ब्रह्मच जगद्रूपाने नटले. म्ह्णजे ब्रह्मालाही एकट्याला राहणे जमले नाही. म्हणजे प्रत्येकालाच संगाची अपेक्षा आहे. आपल्यामध्ये जे कमी आहे, त्याची भरपाई जेथून होते त्याचा संग करणे मानसाला आवडते.मग
तो जीव असो, जड असो की देव असो अथवा संत असो. त्याची संगत माणसाला घडते अणि त्या संगतीवर त्याचे आयुष्य ठरते. जर संगती जडाची, जीवाची असेल तर त्याला बरेचसे दु:खच प्राप्त होते, पण संतांची अणि देवाची संगत घडली तर मात्र त्याला सुख अणि सुखरुपता प्राप्त होते. मानवाच्या पारमार्थिक जीवनामध्ये संतसंग हा अत्यंत महत्वाचा अणि आवश्यक मानला आहे. देवाचा संग जीवला नेहमीच आहे, संतांचा संग मात्र दुर्लभ आहे. आणि अशा प्रकारे जरी राजकीय संगतीत दुःखाचे वेदनेचे अनुभव येत असले किंवा नसले तरी आदिशक्ती मुक्ताई तीर्थस्थळ देवस्थान श्री संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष असलेले भैयासाहेब ॲड. रवींद्र पाटील यांना नेहमी संतांचा , वारकरी व भाविकांचा संग लाभत असतो.नव्हे नव्हे ते संत संगत आणि विचार परंपरेच्या परिघातच नेहमी वावरत असतात. आणि याचा लाभ, आनंद ते नेहमी घेत असतात.

     दरम्यान आदिशक्ती संत मुक्ताई समाधी स्थळी श्री. सदगुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा समिती पंढरपूर व संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर(समाधीस्थळ) द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व निरूपण तसेच भव्य कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात  सुरू असून येथे ह भ प श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृततुल्य वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण व निरूपण सुरु आहे. येथे पारायणाला हजारो भाविक बसलेले असून अतिशय श्रध्देने व एकाग्रतेने येथे पारायण होत आहे. या पारायणात संस्थान चे अध्यक्ष भैयासाहेब ॲड. रवींद्र पाटील देखील सहभागी झालेले असून दररोज नित्य नियमाने ते पारायण करीत असून ते निरूपण व कीर्तन महोत्सवात ही पूर्णवेळ उपस्थित असतात. ते अतिशय श्रध्देने संत संगतीसह भक्तीचा आनंद घेत असून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा परंतु परमार्थात सर्वात पुढे बसा सूचक संदेश त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
Previous Post

मुक्ताई वर श्रद्धा, भाव ठेवून सेवा करा, फल प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही –  ह.भ.प.माधवदास महाराज राठी 

Next Post

खरे संत तेच ज्यांचा हेतू, भक्ती, भाव- विठ्ठल ! आणि अशा खऱ्या संतांचीच संगत धरा  –  ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी 

Admin

Admin

Next Post
खरे संत तेच ज्यांचा हेतू, भक्ती, भाव- विठ्ठल ! आणि अशा खऱ्या संतांचीच संगत धरा  –  ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी 

खरे संत तेच ज्यांचा हेतू, भक्ती, भाव- विठ्ठल ! आणि अशा खऱ्या संतांचीच संगत धरा  -  ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group