गुलालाचे किर्तन व पुष्पवृष्टीने आदिशक्ती संत मुक्ताई 725 वा अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
श्री विठ्ठल, रुख्मिणी माता, संत निवृत्तीनाथ,नामदेव महाराज पालखी सोहळे व लाखो भाविकांची सोहळ्याला उपस्थिती
मुक्ताईनगर : तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर जुनी कोथळी आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा दि 25 मे रोजी तिरोभूत अंतर्धान सोहळा लाखाच्या वर भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.गेल्या 19 मे पासून आईसाहेबांच्या दरबारात ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गीता पारायण आणि नाम संकीर्तन पर्व सुरू तर बुधवारी दि 25 मे रोजीवैशाख वद्य दशमी तिथीनुसार जुनी कोथळी मुक्ताई मंदिरात , पांडुरंग परमात्मा पादुका पालखी,पंढरपुर, निवृत्तिनाथ पादुका पालखी, त्र्यंबकेश्वर, रुख्मिणी माता पादुका पालखी कौडिण्यपुर , संत नामदेव महाराज पादुका पालखी , पंढरपूर , व्यास महाराज पादुका पालखी, अंजाळे,
रेडेश्र्वर महाराज पादुका पालखी, आळेफाटा तसेच विदर्भ , पंचक्रोशीतील हजारो भाविक वारकरी पादुका पालखी सोहळ्याच्या माध्यमातून दाखल झालेले आहेत. या लाखो भाविकांच्या उपस्थितीत संस्थान तर्फे आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आटोपल्यावर संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह भ प केशवदास नामदास महाराज यांचे गुलालाचे किर्तन समारोप प्रसंगी श्री संत मुक्ताई साहेबांच्या प्रतिमेवर पुष्प वर्षाव व महा आरती करून तिरोभूत अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची येथील प्रमूख विश्वस्त योगेश देसाई, पंढरपूर पांडुरंग पालखी सोहळ्याचे प्रमुख सूर्यकांत भिसे, निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर चे अध्यक्ष जयंत महाराज गोसावी, रुक्मिणी माता संस्थान चे अध्यक्ष अमळकर महाराज, संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज केशवदास नामदास महाराज, जोग महाराज संस्थान चे माऊली कदम महाराज, खासदार रक्षा खडसे , जिल्हा बँक माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, प्रभारी नगराध्यक्षा मनीषा पाटील, नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, धनराज महाराज अंजाळेकर विश्वंभर महाराज तिजारे उद्भोज महाराज पैठणकर, नंदकिशोर महाराज पंढरपूर पुसद कर महाराज मोहिते ताई माऊली प्रतिष्ठान मुंबईचे विनीत सबनीस बंडातात्या कराडकर, तिच्यासह संत सोपान काका सासवड संस्थान येडेश्वर संस्थान आळेफाटा संत नरहरी महाराज संस्थान देऊळगाव राजा व इतर प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार संत मुक्ताई संस्थान च अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील, विश्वस्त पंजाबराव पाटील, संदीप पाटील आदींनी केला.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ह भ प रविंद हरणे महाराज यांनी तर आभार विशाल महाराज खोले यांनी मानले. सत्कार समारोह आटपल्यावर लागलीच गुलालाचे कीर्तन व कीर्तनानंतर पुष्प पुष्पवृष्टी करून आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अंतर्धान सोहळा साजरा करण्यात आला.
**********************
संत मुक्ताई व संत निवृत्तीनाथ संस्थानला लाखाची भेट
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी संत मुक्ताई संस्थान तर्फे संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वे वर्ष) वर्ष निमित्त संपूर्ण वर्षभर अखंड कथा कीर्तन व पारायण नाम संकीर्तन सप्ताह ऐतेहासिक पर्वकाळ येथे आयोजित केला याबद्दल संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद भैय्या पाटील यांचा सत्कार केला. व आदिशक्ति मुक्ताई ला भाऊ संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान यांचेतर्फे भेट ५ लक्ष ५१ हजार रु. रकमेचा धनादेश देऊन ओटी भरली. तर संत निवृत्तीदादा संस्थान, त्र्यंबकेश्वर ला ५ लक्ष ५५ हजार रु. रकमेचा धनादेश भेट दिला.
*****************
कीर्तनात मुक्ताई चरित्र निरूपणाने श्रोते झाले भावूक
गुलालाचे कीर्तनात ह भ प केशवदास नामदास महाराज यांनी अंतर्धान सोहळ्यात अभंगावर चिंतन मांडतांना मुक्ताई चरित्र अक्षरशः डोळ्यासमोर उभे करून त्या काळातील प्रसंग , संत ज्ञानेश्वरादी चौघ भावंडांचे किती हाल जगान केले यावर वाकपुष्प व्यक्त करताना स्वतः महाराजच भावूक झाल्याने लाखो डोळे गुलालाचे कीर्तनातून पाणावल्याचे दिसून आले.कीर्तनात मुक्ताई चरित्र निरूपणाने श्रोते झाले भावूक झालेले होते.
******************
दुर्गाताई मराठे यांनी महिला सप्ताह ऐतेहासिक रित्या पार पडला. यात किर्तनकार, गायनाचार्य , मृदंगाचार्य, टाळकरी , वाचक असा अभूतपूर्व महिलांचा सप्ताह येथे सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पार पडला. हा कार्यक्रम मुक्ताई संस्थानचे कीर्तनकार ह भ प सौ दुर्गाताई मराठे यांनी योग्य नियोजन केल्याने यशस्वी रित्या पार पडला या सप्ताहाचे सर्वत्र कौतुक होत असल्याने दुर्गाताई महीला किर्तनकार यांनी यापुढेही अशाच धर्तीवर सहभाग घेवून भविष्यात देखील कार्यक्रम करावे असे गौरवोद्गार संस्थान चे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील यांनी काढले.
******************
सुरत च्या भाविकाने केली पुष्पवृष्टी
मूळचे गाडेगाव ता जामनेर येथील रहिवासी परंतु सध्या सुरत येथे उद्योगपती असलेले राजु राणे यांनी तुळशी व गुलाबाचे पुष्पहार व पुष्प वर्षावासाठी फुले उपलब्ध केली होती.