गंगा दशहरा सप्ताह निमीत्त…
संत मुक्ताई घाटावर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी राबविली स्वच्छ्ता मोहीम !
On the occasion of Ganga Dussehra week…
Cleanliness campaign carried out by the servants of Shri Swami Samarth at Sant Muktai Ghat!
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) मार्फत पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत नदी स्वच्छता अभियान परमपूज्य गुरूमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली प्रत्येक सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व भाविक-सेवेकऱ्यांना सोबत घेऊन गंगा दशहरा सप्ताह निमित्त दि.२० मे ते ३० मे २०२३ दरम्यान नदी, तलाव, घाट स्वच्छता करण्याचे व कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचे तसेच अडगळीत पडलेल्या देवी देवतांचे फोटो , मुर्त्या यांचा योग्य तो विधिवत मानसन्मान करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.यासाठी जल प्रदुषण करणार नाही याची प्रतिज्ञा (शपथ) देखील दिली जात आहे.
दरम्यान याच धर्तीवर श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास सेवा केंद्र , तापी पूर्णा परिसर तर्फे नदी व घाट परिसरात आज दि.२५ मे २०२३ रोजी गुरुवारी आदिशक्ती संत मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर परिसरातील तापी पूर्णा नदी वर असलेल्या मुक्ताई घाटावर सेवेकरी परिवारातर्फे स्वच्छता राबविण्यात आली. सेवेकरी वर्गा तर्फे करण्यात आलेल्या स्वच्छ्ता मोहिमेत घाटावर फोटो ,तुटलेल्या काचा, बांगड्या , व इतर प्रचंड झालेल्या घाणीचे संकलन करून स्वच्छता करण्यात आली.यावेळी सेवेकरी बांधवांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, नदीचे पाणी प्रदुषित होऊ नये म्हणून
१) औद्योगिक हानिकारक रसायने, विषारी पदार्थ आणि इतर धोकादायक कचरा नदीच्या पाण्यात सोडू नये.
२)निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव वा धरणात टाकू नका.
३)कीटकनाशक नदीच्या पाण्यात सोडू नये.
४)प्लास्टिकच्या पिशव्या नदीच्या पाण्यात जाणार नाही याची काळजी घेणे घरगुती सांडपाणी STP प्रक्रिया (स्वच्छ) करून नदीत सोडावे.
असे आवाहन करण्यात आलेले आहे.
*गंगा दशहरा सप्ताह निमीत्त…*
*संत मुक्ताई घाटावर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी राबविली स्वच्छ्ता मोहीम !*
अवघ्या काही तासात मुक्ताई घाट झाले चकाचक
*बघा व्हिडिओ वृत्तांत*
https://youtu.be/xRrML5Ghupo
*संत मुक्ताई घाटावर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी राबविली स्वच्छ्ता मोहीम !*
अवघ्या काही तासात मुक्ताई घाट झाले चकाचक
*बघा व्हिडिओ वृत्तांत*
https://youtu.be/xRrML5Ghupo