खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेतले आदिशक्ती संत मुक्ताई चे दर्शन
मुक्ताईनगर : जळगांव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुक्ताईनगर भेट दिली असता भेटी पूर्वी त्यांनी जुनी कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताई यांचे समाधीस्थळ तसेच नवीन मुक्ताई मंदिर येथे दर्शन घेतले.
प्रसंगी मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ऍड. रविंद्रभैय्या साहेब पाटील ,मुक्ताई संस्थान विश्वस्थ पंजाबराव पाटील,विनोद तराळ ,ह भ प रवींद्र महाराज हरणे , व्यवस्थापक मुक्ताई संस्थान ह भ प विनायक महाराज हरणे, व्यवस्थापक जुनी कोथळी मंदिर ह भ प उध्दव महाराज जूनारे , सम्राट पाटील , ज्ञानेश्वर हरणे आदींची उपस्थिती होती.
***************
तसेच कल्पेश बेलदार यांनी मुक्ताई संस्थान ला साउंड सिस्टीम सप्रेम भेट दिली त्यांचे स्वागत खासदार सुप्रियाताई सुळे व मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी केले.