Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

खडसेंना धक्का : मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेला स्थगिती

Admin by Admin
July 28, 2023
in मुक्ताई वार्ता
0
खडसेंना धक्का : मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेला स्थगिती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
खडसेंना धक्का : मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेला स्थगिती
मुक्ताईनगर  : जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर करू न शकल्याने अपात्र झालेल्या येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आली असून या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. तोवर त्या लवकरच नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
या संदर्भातील अधिकृत वृत्त असे की, जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी येथील नगराध्यक्षा सुरेखा अफजल तडवी उर्फ नजमा इरफान तडवी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले होते. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नजमा तडवी यांनी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. हे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने नियमानुसार त्यांनी सहा महिन्यांच्या आत आणि सुधारित निर्देशानुसार एक वर्षाच्या आत आपले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र अडीच वर्षे उलटण्याच्या मार्गावर असतांना देखील त्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. या पार्श्वभूमिवर, गिरीश रमेश चौधरी यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे नजमा तडवी यांना अपात्र करण्यात यावे अशा मागणीचे अपील सादर केले होते. यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नजमा तडवी यांना ८ नोव्हेंबर २०२१ रोजी अपात्र ठरविले होते. यानंतर सदरील अपत्रतेची कारवाई चुकीची झाल्याची टीप्पनी करीत श्रीमती तडवी यांनी राज्याचे नगरविकास मंत्रालयात अपील सादर केलेले होते.
दरम्यान, नजमा तडवी यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या तसेच  ना. गिरीश महाजन व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटल्या. यातून आज त्यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आली आहे. अर्थात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा निर्णय हा स्थगित करण्यात आला असून १७ ऑगस्ट रोजी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. तर, नजमा तडवी या सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार पुन्हा सांभाळणार आहेत. मुक्ताईनगरच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात या माध्यमातून मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अलीकडेच विधानसभेत राजकीय दबावामुळे मुक्ताईनगर येथील तडवी समाजाच्या नगराध्यक्षांना अपात्र केल्याचा आरोप केला होता. यानंतर काही दिवसांमध्येच या अपात्रतेला स्थगिती मिळाल्याची बाब लक्षणीय आहे. माध्यमांना या संदर्भातील माहिती आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली असून याप्रसंगी त्यांच्या सोबत स्वत: नजमा तडवी आणि सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे हे देखील उपस्थित होते.
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar News
Previous Post

संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगरीत भव्य वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धा

Next Post

संत मुक्ताई पालखी सोहळा समिती तर्फे आयोजित बैठकीत जमा-खर्च विवरण जाहीर ! 

Admin

Admin

Next Post
संत मुक्ताई पालखी सोहळा समिती तर्फे आयोजित बैठकीत जमा-खर्च विवरण जाहीर ! 

संत मुक्ताई पालखी सोहळा समिती तर्फे आयोजित बैठकीत जमा-खर्च विवरण जाहीर ! 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group