कोथळीची ऍथलेटिक्स चॅम्पियन बालिका स्पर्धेसाठी गुवाहाटी कडे रवाना
आमदार चंद्रकात पाटील यांनी केली प्रोत्साहनपर रोख मदत
मुक्ताईनगर : गुवाहाटी येथे होत असलेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी रवाना झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील ऍथलेटिक्स चॅम्पियन बालिकेला प्रोत्साहन म्हणून प्रवासासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्व खर्चातून ३५ हजार रुपयांची नगदी रोख मदत केली. आज दि.६ नोव्हेंबर रोजी या मुक्ताईनगर साठी अभिमानाची बाब असलेल्या १४ वर्षीय ऍथलेटिक्स चॅम्पियन बालिका गुवाहाटी कडे रवाना झाली अशी माहिती कोथळी चे उपसरपंच पंकज राणे यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन स्पर्धेत अंडर 14 या वयोगटात कुमारी भूमिका संजय नेहते ही पहिली आल्यानंतर तिचे नॅशनल लेव्हल ला निवड झाली होती त्यानुसार ती छत्तीसगड येथील रायपूर येथे ३३ व्या वेस्ट झोन ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यात तिने 60 मीटरच्या स्पर्धेत एकूण 8.08 सेकंदात दुसऱ्या क्रमांकाने आली असून 600 मीटरच्या स्पर्धेत देखील 1.4088 सेकंदात दुसरी आलेली असल्याने दिनांक 11 ते 15 नोव्हेंबर रोजी ती गुवाहाटी येथे पुढील स्पर्धेसाठी रवाना झाली असून या खेळाडूच्या प्रवासाचा खर्च सोयीचा व्हावा म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वखर्चातून ३५ हजार रु. ची रोख मदत दिली. एका सर्व सामान्य कुटुंबातून ही बालिका तालुक्याचे नाव लौकीक करीत असताना तिला पुढे येवून मदत केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या खेळाडूविषयी असलेल्या भावनेबद्दल कौतुक होत आहे.
गुवाहाटी कडे प्रस्थान प्रसंगी भावना च्या कुटुंबीयांसह उपसरपंच पंकज राणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश राणे सर, ग्रामपंचायत सदस्य बाळा विटकरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन कोळी, पिंटू पाटील, शुभम पाटील, गणेश इंगळे आदींची उपस्थिती होती.