केशवदास नामदास महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने,
मुळमंदिरात संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याची सांगता !.
मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान समाधी (७२६ वे वर्ष) सोहळ्याची सांगता दि.१६ मे रोजी मंगळवारी सकाळी संत नामदेव महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण केशव दास नामदास महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी संत मुक्ताई साहेब तसेच संत महाराज पादुका पालखी सोहळा यांची पूजा व महाआरती हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडली.
यावेळी संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष भैय्यासाहेब ॲड रवींद्र पाटील, तसेच संस्थानं चे इतर सर्व विश्वस्त , संत नामदेव महाराज पादुका पालखी सोहळ्याचे विश्वस्त पदाधिकारी , संदीप भैय्या पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त पारायण रविंद्र हरणे महाराज , हरिभक्त पारायण संदीप महाराज खामनीकर , हरिभक्त पारायण दीपक महाराज, हरिभक्त पारायण पंकज महाराज , हरिभक्त पारायण लखसं महाराज, मूळ मंदिर व्यवस्थापक हरिभक्त पारायण उद्धव जुनारे , हरिभक्त पारायण लखन महाराज , हरिभक्त पारायण अंबादास महाराज सरोदे , हरिभक्त पारायण रतिराम महाराज,हरिभक्त पारायण दूर्गाताई मराठे महाराज, माझी माऊली चॅनेल चे चेअरमन गणेश आढाव आदींसह संत मुक्ताई वर निष्ठा असलेल्या किर्तनकार , टाळकरी , फडकरी मंडळींची उपस्थिती होती.
संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा नुकताच दि.१४ मे २०२३ रोजी पार पडला या सोहळ्याला परंपरेनुसार पांडूरंग परमात्मा (पंढरपूर) , रुक्मिणी माता (कौडीण्यपुर) , संत नामदेव महाराज (पंढरपुर) , संत निवृत्तीदादा(त्र्यंबकेश्वर) पालखी सोहळे व जळगांव , धुळे , नाशिक ,बुलढाणा, अकोला तसेच विदर्भातील इतर असंख्य जिल्हे व मध्यप्रदेशातील असे लाखो भाविक व वारकऱ्यांचे
उपस्थितीत संपन्न झाला.
संत मुक्ताई तिर्थक्षेत्र संलग्नित अधिकृत बातम्यांसाठी संत भूमीत निर्माण झालेले आपले लोकप्रीय मुक्ताई वार्ता मराठी न्युज चॅनेल युट्यूब ला सबस्क्राईब, लाईक कमेंट करायला विसरू नका ही विनंती आणि हो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद !
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी आमचे मुक्ताई वार्ता युट्यूब चॅनेल वर भेट द्या ही विनंती.