केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुश खबर ,लवकरच CMV रोगाची नुकसान भरपाई मिळणार !
आ.चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश !
मुक्ताईनगर येथे गेल्या वर्षी दि.२०: सप्टेंबर २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आले असता, येथे झालेल्या जाहीर सभेत मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी CMV या केळीवर येणाऱ्या रोगा संदर्भात नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मागणी केली होती. तसेच हिवाळी अधिवेशन, डिसेंबर २०२२ मध्ये देखील या मागणी संदर्भात माहितीचा मुद्दा मांडून नुकसान भरपाई देणार की नाही असा खडा सवाल सरकारला विचारला होता तसेच केलेली पाठपुरावा सुरू ठेवला होता, या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी लवकरच CMV रोगाची नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले असल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.