केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या “कीर्ती” शिबिराचे जळगांव येथे उद्घाटन !
“खेल प्रतिभा खोज”
“है दम तो बढ़ाओ कदम”
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या Khelo India Rising Talent Identification अर्थात KIRTI योजना शिबिराचे रक्षा खडसे ( केंद्रीय राज्यमंत्री क्रिडा व युवक कल्याण ,भारत सरकार) यांच्या उपस्थितीत #जळगांव येथे दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी उद्घाटन संपन्न झाले. जळगाव जिल्ह्यातील 9 ते 18 वयाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या एकलव्य क्रीडा संकुल, एम.जे.कॉलेज येथे 4 ते 6 सप्टेंबर 2024 या तीन दिवसासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व शाळांनी व पालकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
भारताला 2036 पर्यंत जगातील पहिल्या 10 तर 2047 पर्यंत पहिल्या पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवायचे आहे. KIRTI ही भारतीय खेळ जगताचा कायापालट करणारी एक महत्वाकांशी योजना असून, यामध्ये कमी वयात विद्यार्थ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने वेगवेगळ्या खेळ प्रकारासाठी योग्यता तपासली जाते. 2024-25 या आर्थिक वर्षात सर्व राज्यांमध्ये KIRTI या उपक्रमासाठी जिल्हास्तर ग्राह्य धरून 20 लाख खेळाडूंचे मूल्यांकन करून त्यातून प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. जनतेच्या सहभागातून देशातील प्रत्येक मुलापर्यंत खेळ पोहोचावेत आणि खेलो इंडियाच्या रचनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू शोधता यावेत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून हे लक्ष्य आहे.
आधुनिक माहिती संपर्क (आयसीटी) साधने आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींवर आधारित एक एकीकृत प्रतिभा शोधणारी प्रणाली विकसित करण्यासाठी कीर्ती हा उपक्रम सुरू झाला आहे. प्रतिभावान खेळाडू शोधण्याची संपूर्ण प्रक्रिया एका ठिकाणी व्यवस्थितपणे उपलब्ध करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
यावेळी माझ्यासह भारतीय खेळ प्राधिकरण प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे, संस्था अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी (प्रशिक्षण) कुमारी वेवोतोलू केझो, अशोकजी जैन, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, सौ.उज्वला बेंडाळे, डॉ.केतकी पाटील, संजय भारंबे सर,भरत अमळकर, श्रीकांत मणियार, अॅड.प्रमोद पाटील, संजय प्रभूदेसाई, डॉ.हर्षवर्धन जावळे,डी.टी.पाटील, रुपेश चिरमाडे, डॉ. अशोक राणे ई. प्रमुख उपस्थितीत होते.