का होतेय या महा कावड यात्रेची चर्चा | आ. चंद्रकांत पाटलांचे प्रचंड शक्ती प्रदर्शन | गर्दीचा उच्चांक
शेवटच्या श्रावण सोमवारी निघाली “हर हर महादेव” जय घोषात न भूतो न भविष्यति अशी महा कावड यात्रा
कावड यात्रेतील वाद्यांची भुरळ आ. चंद्रकांत पाटील यांनीही धरला ‘ठेका’ !*
मुक्ताईनगर : हिंदु सनातन धर्म उत्सव समिती, विविध हिंदू संघटना तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगदेव मंदीरापासून निघालेल्या डोळ्यांची पारणे फिटेल अशी भव्य दिव्य कावड यात्रेत अनेक हजारो हिंदू भाविकांनी सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. या यात्रेत डीजे आणि ढोल ताशांच्या तालावर मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठेका घेतल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.तसेच आमदारांनी पूर्ण वेळ कावड यात्रे मध्ये उपस्थित राहून कावड यात्रेचा आनंद घेतला. पहा येथील क्षणा क्षणाचे कव्हरेज असेच ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले सुंदर दृश्य केवळ मुक्ताई वार्ता वर
हजारोंच्या संख्येत निघालेल्या या कावड यात्रेने एक नवे रेकॉर्ड केलेले असून अतिशय शांततेत निघालेली ही कावड यात्रा चांगदेव ते संत मुक्ताई मंदिर जुनी कोथळी ते नवीन कोथळी ते प्रवर्तन चौक आणि बोदवड रोडवरील स्टेट बँक ते जुने गाव नागेश्वर मंदिर अशी दिमाखात निघालेली कावड यात्रा मिरवणुकीची सांगता रात्री ठीक १० वाजेच्या आत झाली तर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक शेवाळे, आणि बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पहा ड्रोन कॅमेरातील दृश्य !
आमच्या युट्यूब चॅनेल वर ही बातमी व्हिडिओ स्वरूपात पाहू शकता , खालील लिंक शोधा किंवा @muktai varta ओरिजनल लिंकला भेट द्या