उद्या कार्तिकी एकादशी : मुक्ताई चरणी हजारो भाविक होणार लीन
…तर प्रवर्तन चौकात प्रभू श्रीराम व आदिशक्ती मुक्ताईच्या भव्य महाआरतीचे आयोजन
मुक्ताईनगर : कार्तिकी एकादशी ही वारकरी संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा पर्व या दिवशी पांडुरंगाची पंढरपूरला आषाढी प्रमाणेच मोठा यात्रोत्सव असतो. याकाळात गाव खेड्यात तिर्थक्षेत्रांवर पूर्ण महिना भर काकड आरती, भजन, कथा, किर्तन तसेच भक्तिमय वातावरण असते. जे भाविक पंढरपूर ला जावू शकत नाही ते संतांचे दर्शन करीत असतात. त्यामुळे आदिशक्ती मुक्ताई चे दर्शनासाठी जळगाव खान्देश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्यप्रदेशातून भाविक वारकरी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे उद्या मुक्ताईनगर येथे भाविकांची प्रचंड हजारोंच्या संख्येत गर्दी असणार असून त्यातच बाळासाहेबांची शिवसेना यांच्या तर्फे देखील उद्याचा शुभ मुहूर्त साधून प्रवर्तन चौकात प्रभू श्रीराम, पंढरीश परमात्मा , माता जगदंबा तसेच संत श्रेष्ठ आदिशक्ति मुक्ताई साहेब यांची भजन संध्या तसेच भव्य महाआरती चे दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम देखील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे.
त्यामुळे उद्या संत दर्शन , भजन संध्या, महाआरती यासह टाळ मृदुंगाच्या गजरात संत भूमी मुक्ताई नगरी दुमदुमनार आहे.
वारकरी तर म्हणतात ,
जाऊं देवाचिया गांवां ।
देव देईन विसांवा ॥१॥
देवा सांगों सुख दुःख ।
देव निवारील भूक ॥२॥
घालूं देवासी च भार ।
देव सुखाचा सागर ॥३॥
राहों जवळी देवापाशीं
आतां जडोनि पायांसी ॥४॥
तुका म्हणे आम्ही बाळें
या देवाचीं लडिवाळें ॥५॥