आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भाड्यांचा संच वाटप !
जय मुक्ताई
मी संतोष मराठे आपले मुक्ताई वार्ता चॅनल मध्ये स्वागत करतो..
आता वळूया बातमीकडे
‘मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत’ कामगार नोंदणी अंतर्गत Online केलेल्या पात्र लाभार्थी बांधव व भगिनी महिलांना २१ जुलै २०२४ रोजी रविवारी आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भांड्यांचा संच वाटप करण्यात आला.
‘शासन आपल्या दारी’ या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांना मोफत उपयोगी घराघुती भाड्यांचा संच वाटप करण्यात येत असतात.त्यानुसार भांडे संचासाठी नोंदणी केलेल्या सुमारे ५०० पात्र लाभार्थ्यांना भाड्यांचा संच वाटप करण्यात आला.
या यशस्वी शिबिराचे श्रेय केवळ शिवसेना शहर संघटक वसंत भलभले यांना जाते त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनत आणि पाठपुराव्यामुळे सदरील पात्र लाभार्थ्यांना भांड्यांचा संच मिळाल्याने सर्वांकडून भलभले यांचे कौतुक होत आहे. तर आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडून बांधकाम कामगारांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आलेली असून आता सर्व प्रकारच्या online नोंदणी साठी येत्या आठ ते दहा दिवसात मुक्ताईनगर व बोदवड येथे तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
‘याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, राजेंद्र तळेले, सुनील गवते, नरेंद्र सापधरे, विशाल भलभले, निलेश घटे, गणेश भोजणे, चेतन पाटील, पिंटू गलवाडे, प्रल्हाद माळी, गजानन काटे तसेच शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा, आणि कमेंट करून आपले बहुमूल्य मत कळवा तसेच मुक्ताई वार्ता चॅनल युट्यूब ला SUBSCRIBE तर फेसबुक आणि इंस्टाग्राम ला फॉलो करा ही विनंती.