मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी या आदिवासी गावांमध्ये पावसाचे पाणी घुसून गावाला धोका निर्माण झालेला होता. यासंदर्भात चार ठाण्याचे सरपंच सूर्यकांत पाटील, रमजान शेख व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून येथे संरक्षण भिंत बांधकाम व्हावी अशी मागणी लावून धरली होती या मागणीच्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे तसेच आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित , जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केलेल्या पाठपुरावा व पत्र व्यवहारामुळे जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे ओटीएसपी या योजनेअंतर्गत मौजे मधापुरी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे (1.50 कोटी रू.) निधीसह मंजुरी मिळालेली आहे.

