*आ.चंदूभाऊ पाटील- सूर्योदय नव्या पर्वाचा*
वाय डी पाटील यांच्या लेखणीतून
२४ ऑक्टोबर २०१९ ची पहाट ,महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस. संपूर्ण खान्देशात उत्सुकता ती मुक्ताईनगर मतदारसंघात परिवर्तन होणार का ? ह्या गोष्टीची.
अनेक आडाखे ,अंदाज बांधले जात होते नेमकं काय होऊ शकते ह्यावर सकाळपासून चर्चा झडत होत्या. भाजपाची लाट , दिग्गज नेत्याच्या कन्येने भाजपकडून निवडणूक लढविली आहे, भाजपचे एकहाती सरकार जवळपास निश्चित आहे, अपक्ष उमेदवाराचा काय निभाव लागणार ?हा सार्वत्रिक चर्चेचा विषय.
सर्वच अंदाज फोल ठरले तो दिवस ३० वर्षाच्या बहूप्रतिक्षित परिवर्तनाचा ठरला. अपक्ष म्हणून चंदूभाऊंनी मैदान मारले. तब्बल ३० वर्षानंतर मुक्ताईनगर मतदारसंघात बदल घडला तो बदल नव्हे तर ऐतिहासिक म्हणता येईल असे परिवर्तन ठरले.
जे ३० वर्षात भल्याभल्यांना जमले नाही ते एका वंदनीय बाळासाहेबांच्या एका कट्टर शिवसैनिकाने करून दाखवले त्याचं नाव आहे चंद्रकांत पाटील. जनसामान्यांचा लाडका चंदूभाऊ आणि एक कडवट शिवसैनिक. त्यांना साथ दिली ती त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांनी ,मतदाससंघातील सर्वोपरी असलेल्या माय बाप जनतेने.
सामान्यांचा चंदूभाऊ आता आमदार चंदूभाऊ झाला होता. विजयाचा तो अभूतपूर्व जल्लोष , कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू , आपला चंदूभाऊ निवडून आला रे ,असं एकमेकांना फोन करून सांगणारी ती संघर्षातून कमावलेली जीवापाड प्रेम करणारी माणसं ,त्यांचा उत्साह हा विजय किती मोठा आहे हे दर्शवित होता. प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतः आमदार झाल्याचा वाटणारा तो क्षण लेखणीतून साकारणे कठीणच होते. चंदूभाऊंच्या विजयानंतर जल्लोष करत असताना दिसून येणारी भावनिकता महाराष्ट्रभर क्वचितच कुठे दिसली असेल. हे चंदूभाऊंचं वलय आणि गारुडचं म्हणता येईल.
हा काय निवडून येईल ? अपक्ष आहे डिपॉझिट तरी वाचेल का ? लाट आहे ह्याचा काय निभाव लागणार ? भाजपला हरवणं काय गम्मत वाटली का ? अशी चर्चा करणाऱ्या अनेकांना चंदूभाऊंचा विजय हे जनतेने दिलेलं उत्तर होतं. हा विजय म्हणजेच परिवर्तनाची सुप्त ईच्छा मनाशी बाळगून असलेल्या मतदारांचा विजय ठरला.
हे वास्तव होतं , मात्र काही मर्यादा असल्यामुळे ते मी तेव्हा मांडू शकलो नाही पण आज मांडतोय कारण माझ्या पहिल्याच भेटीत ,माझ्या मनाला भावलेला जो कुणी असेल तर तो व्यक्ती आहे आमदार चंदूभाऊ पाटील.
मी अगदी काही दिवसांपूर्वीचं पहिल्यांदा चंदूभाऊंना भेटलो ,काही तासातच त्यांची ती काम करण्याची धडाकेबाज पद्धत , चुटकीसरशी निर्णय घेण्याची अद्भुत कला ,मला अचंबित करून गेली. बोलता बोलता मी एका पेशंटचा विषय सांगितला , चंदूभाऊ लगेच बोलले , मुंबईला या किंवा माझ्यासोबत चला लगेच काम मार्गी लावतो. माझ्यासारख्या एका अगदीच नवख्या कार्यकर्त्याला त्यांनी दिलेला तो शब्द हा चंदूभाऊंच्या मोट्या मनाचं एक उत्तम उदाहरण आहे.
मुंबईला गेलो त्यांना कॉल केला ,”चंदूभाऊ कुठं आहात ?” ते म्हणाले “मंत्रालयात आहे तुम्ही कुठे आहात?” मी बोललो “मंत्रालयाच्या मेन गेटवर आहे”
वाय डी पाटील थांबा मी स्वतः तुम्हांला घ्यायला येतो एवढा दिलदार मनाचा हा माणूस.
बरंच काही लिहिणार आहे ,चंदूभाऊंच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत त्याचा बारकाईने अभ्यास मी करतोय . अजून एक सांगतो मी जे लिहितो ते बेडरपणे ,कुणाची तमा न बाळगता ह्याचा अनेकांना अनुभव आहे. ते कदाचित माझ्यावर टीका करतील पण चिंता नाही. ज्याचं काम करावं ते निष्ठेने आणि समर्पित भावनेने हा माझा मूळ स्वभाव आहे . तो बदलणार नाही ,चंदूभाऊंच्या नेतृत्वात यापुढे काम करणार हे शाश्वत सत्य आहे . कुणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी उपयोग होणार नाही. कुणावर मी टीका केलेली नाही परंतु माझ्या पोस्टवर कुणी अकारण भाष्य केलं तर त्याला सडेतोड उत्तर मिळेल. चंदूभाऊंचं कार्य यापुढे सतत लेखणीतून मांडत राहीन. अभी तो शुरुआत है….तूर्तास थांबतो….
लेखक : वाय डी पाटील