आषाढी देव दर्शनानंतर संत दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी !
टाळ मृदंग व नामाच्या गजरात दुम दुमले अवघे तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर
मुक्ताईनगर- आषाढी कामिका एकादशीला आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शेकडो पायी दिंड्यानी श्री क्षेत्र मुक्ताईनगर व कोथळी स्थित नवीन व जुन्या मंदिरात टाळ मृदंगाच्या गजरात हजेरी लावल्याने संपूर्ण मुक्ताईनगरी टाळ मृदुंगाच्या मंगलमय धुनित दुम दुमल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. आषाढी एकादशीला पंढरपूरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी घराकडे परतल्यानंतर आप आपल्या परिसरातील संत दर्शन घेण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार खान्देश , विदर्भ व मध्यप्रदेशातील लाखो भाविकांनी आज तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे येवून आदिशक्ती संत मुक्ताई दर्शन घेतले. यावेळी शहरातील रस्त्यावर व मंदिर परिसरात दिंडी सोहळ्याच्या पवित्र टाळ, मृदुंग व नाम घोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झालेले होते.
“धन्य आजी दिन संत दर्शनाचा । आनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥”

” जो करील याची यात्रा | तो तारील सकळ गोत्रा ||
सकळही कुळ पवीत्रा | याचिया दर्शने होति || “
जुनी कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताई चे समाधीस्थळ मंदिराचेहेमाडपंथी बांधकाम रखडलेले आहे. दर्शन बारी साठी अपूर्णावस्थेत असलेल्या बांधकामातून सकाळपासून भाविकांची लाखोंच्या उपस्थिती वाढल्याने दर्शन बारी लावण्यात आलेली होती.
***********************
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिशक्ती संत मुक्ताई चे जुनी कोथळी येथे दर्शन घेतले. त्यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
***********************
यात्रेस्वरुपातील गर्दीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येवून पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत वाहतुकीची कोंडी देखील सुरळीत करण्यात येत होती.
***********************
फराळ , दराबा व खेळण्यांच्या दुकानांनी व भाविकांची सकाळ पासूनच लाखाच्या वरील उपस्थितीने तसेच दिंडी सोहल्यांनी जणू यात्राच भरलेली येथे दिसून येत होती.