आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित,
बोदवड येथील आरोग्य शिबिरात रेकाॅर्ड ब्रेक 887 रुग्णांची तपासणी !
बोदवड : एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रीय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदु उपचार शिबीर यशस्वी रित्या पार पडले. मुक्ताई मंगल कार्यालयात पार पडलेल्या शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण 887 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात 101 महिलांची व 181 पुरुषांची कर्करोग तपासणी पार पडली. यात 57 संशयित कर्करोगाचे रुग्ण तपासणीतून निदर्शनास आले आहे. मोतिबिंदूच्या 285 महिलांची 320 पुरुषांची तपासणी पार पडली. यात 78 गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर येत्या पंधरवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून 150 सामान्य रुग्णांवर 3 महिन्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक गोलुभाऊ बरडिया यांनी दिली आहे.
आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल हे मुंबईला असल्या कारणाने त्यांच्या सौभाग्यवती सौ. यामिनीताई पाटील व कन्या कु. संजनाताई पाटील यांनी कार्यक्रमाला भेट दिली.
यावेळी बोदवड नगरीचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, संगायो समितीचे अध्यक्ष डॉ उद्धवराव पाटील , जिल्हा ग्रामीण रुग्णालयचे डॉ प्रवीण पाटील, आरोग्यदुत मुंकुद गोसावी, बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ किर्ती साळे, नाशिक येथील मानवता हाॅस्पिटलचे प्रसिद्ध तज्ञ डॉ व आरोग्य टीम, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस सर्व नगरसेवक नगरसेविका शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी बंधू पत्रकार बांधव डॉ बांधव शिवसेना पदाधिकारी तालुक्यातील नागरिक व हजारो रूग्ण उपस्थित होते.