👉 आमदार चंद्रकांत पाटील यांचे दि.७ जुलै गुरूवार रोजी मुक्ताईनगरात होणार आगमन !
👉 समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व हिंदुत्ववादी जनता करणार जल्लोषात स्वागत !!
मुक्ताईनगर : राज्यातील महाविकास आघाडीशी फारकत घेवून शिंदे गटातील शिवसेनेचे सुमारे ४० व सहयोगी १० आमदार असे एकूण ५० आमदार सुरत ते गुवाहाटी व गोवा असा मार्गक्रमण करीत सरते शेवटी शिवसेना व भाजप ची नैसर्गिक युती करून सत्तेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असा शपथविधी पार पडला तसेच या सरकारने दि.४ जुलै रोजी यशस्वी विश्वास दर्शक ठराव बहुमताने पास केला.
या सरकार मध्ये मोलाची भूमिका असणारे मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील हे गुरूवारी दि.७ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुक्ताईनगर येथे स्वगृही येत असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्वागता साठी मतदार संघातील मुक्ताईनगर , बोदवड व रावेर तालुक्यातील नागरिक ,समर्थक कार्यकर्ते , आर एस.एस ,विविध हिंदूत विवादी संघटना, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते, सरपंच, नगराध्यक्ष ,नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रा.पं सदस्य हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
*******************
या पूर्वी महाविकास आघाडीला दिला होता पाठींबा यांचे सोसावे लागले चटके :
आमदार चंद्रकांत पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते. एक मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढणे साठी त्यांनी त्यावेळेस नव्याने स्थापन झालेल्या महविकास आघाडी सरकार ला बिनशर्त पाठींबा देवून त्यांनी मतदार संघासाठी विकासाची कास धरली होती. परंतु त्यांचे कट्टर विरोधकांनी महविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला व इथून मतदार संघातील प्रत्येक कामात श्रेयवाद होत विकास कामांना खीळ बसवत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गृहमंत्रालय हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून येथे दबावाचे राजकारण होताना दिसून येत होते. एक प्रकारे महा विकास आघाडीचे घटक असल्यावरहि राज्यातील इतर आमदारांप्रमाने सत्तेत च चटके सोसावे लागत होते. शिवसेना विधासभा क्षेत्र प्रमुख , तालुका प्रमुख व एक ग्रामपंचायत सदस्य यांना खोट्या गुन्ह्यात घर दार सोडून वणवण भटकावे लागत होते. यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातील व जिल्ह्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. यामुळेच नियतीला देखील हे पहावले गेले नाही शिंदे यांनी घेतलेल्या भूमीकेमुळे राज्यात शिवसेना भाजप युती चे जनतेच्या मनातील नव सरकार स्थापन झाले. या सरकार शिंदे गटात थांबून विश्वास दर्शक ठराव असेल किंवा विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मोलाचे मत देऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी तमाम जनतेला अभिप्रेत असलेल्या शिवसेना भाजप सरकार ला सत्तेत आणलेले आहे आणि या सत्तेत सहभागी ते MIDC , पाणीपुरठा योजना , मोठ मोठे व्यापारी संकुल , मतदार संघातील पायाभूत व मूलभूत गरजा यासाठी जास्तीत जास्त खेचून आणण्यासाठी पुन्हा त्याच पोटतिडकीने काम करणार आहे.त्यामुळे ते मुक्ताईनगरात येताच त्यांचे सर्वांसाठी जंगी स्वागत होणार आहे.
****************
आमदार चंद्रकात पाटील यांचे स्वागत करण्यासाठी दि.८ जुलै २०२२ रोजी गुरूवारी सकाळी १० वाजता मतदार संघातील मुक्ताईनगर , बोदवड व रावेर तालुक्यातील नागरिक ,समर्थक कार्यकर्ते , आर एस.एस ,विविध हिंदूत विवादी संघटना, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते, सरपंच, नगराध्यक्ष ,नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रा.पं सदस्य हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.