आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली वचनपुर्ती..
मुक्ताईनगर येथे बौद्ध समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकामास ५० लक्ष भरीव च्या निधीसह मंजुरी
मुक्ताईनगर : शहरातील प्रभाग क्र.१७ मध्ये बौद्ध समाज बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे समाजासाठी हक्काचे सभागृह व्हावे अशी मागणी केली होती यानुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्याने मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांनी सदरील कामांना प्राधान्य देत हिरवी झेंडी दिली असून नगरविकास विभागातर्फे नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी “सहाय्य योजनेअंतर्गत” शासन निर्णय क्रमांक – ननपं- २०२२/प्र. क्र.३३(०८)/नवि-१६ मंत्रालय, मुंबई या दि.१० मे २०२२ रोजी शासन निर्णयानुसार मुक्ताईनगर येथे हद्दीत प्रभाग क्र.१७ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे.( ५० लक्ष ) अशा भरीव निधीसह मंजुरी मिळाली आहे.
बौध्द समाजाच्या मागणीला प्राधान्य मिळाल्याने समाजातर्फे आनंद व्यक्त केला जात असून यासंदर्भात पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे , भीमराव घोरपडे अप्पा , बी डी गवई , पी डी सपकाळे , किशोर बोदडे आदींसह इतर असंख्य समाज बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले